राज्यातील ३८५ फौजदारांना वर्दीची प्रतीक्षाच

Maha Police .jpg

पुणे :- अथक प्रयत्न करून पोलीस उपनिरीक्षक (Sub-Inspector) अर्थात फौजदार परीक्षा राज्यातील ३८५ युवक उत्तीर्ण झाले. शारीरिक चाचणी, मुलाखत होऊन तीन वर्षे होत आले तरीही ट्रेनिंगसाठी बोलावले नाही. आज, उद्या बोलावतील या प्रतीक्षेत हे विद्यार्थी आहेत. यामध्ये काही मुलींचाही समावेश आहे. त्यांना त्यांच्या भावी करिअरची चिंता सतावत आहे. विद्यार्थ्यांचा महाविद्यालयीन काळात स्पर्धा परीक्षेचा अभ्यास जोर धरतो.

साधारण पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या प्रयत्नांत यश मिळते. साधारण २५-२६ वर्षापर्यंत विद्यार्थी ‘पीएसआय’ची परीक्षा उत्तीर्ण होतात. यानंतर एक-दीड वर्षात सर्व प्रक्रिया पूर्ण करून त्यांना प्रत्यक्षात वर्दी घालून फिल्डवर येता येईल, अशी त्यांची अपेक्षा असते. मात्र या प्रक्रियेची दिरंगाई अधिक होत आहे. केवळ प्रक्रियेसाठी दिरंगाई होत असल्यामुळे विद्यार्थी-विद्यार्थिनींच्या करिअरचा आलेख चुकत असल्याच्या भावना विद्यार्थिनींच्या आहेत. अनेकांनी लग्न केलेले नाही, तर काहींना भविष्याचे नियोजन सतावत आहे. परीक्षेसाठी दोन-तीन वर्षे आणि यश मिळाल्यानंतर पुन्हा तीन वर्षे थांबूनसुद्धा वर्दी अंगावर चढविता येत नसल्याने नाराजी वाढत आहे. तातडीने ट्रेनिंग पूर्ण करून त्यांना नियुक्ती मिळावी.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER