कोल्हापुरात कोरोना लसीचे ३७५८० डोस पोहोचले

Coronavirus Vaccine Reached Kolhapur

कोल्हापूर :- कोरोना (Corona) संसर्ग टाळण्यासाठी कोव्हॅक्सिीन (Covaxin) लस आज कोल्हापूरात दाखल झाली. येत्या काही तासात लसीकरण सुरू होणार आहे. काही दिवसापूर्वी यशस्वी झाली आहे. त्यानुसारच जिल्ह्यातील शासकीय कोरोना योध्यांना हे लसीकरण होईल त्यासाठी पुणे आरोग्य विभागाकडून ३७५८० डोस कोल्हापुरात पोहोचले आहेत.

कोल्ड पॅकिंग व्हॅनव्दारे या लस येथे आणण्यात आल्या. त्यासाठी आरोग्य विभागाचे एक पथक कोल्ड व्हॅनसह पुण्याला गेले होते ते आज लस घेऊन परतले आहे. आणलेल्या लस या वैद्यकीय शितगृहात ठेवण्यात येणार आहे. त्यात सीपीआर रूग्णालय, आयसोलेशन हॉस्पीटल, सेवा रूग्णालय , पंचगंगा हॉस्पिटल व पुलाची शिरोली आरोग्य केंद्र आदी 25 ठिकाणी शासकीय सेवेतील हे लसीकरण होणार आहे. त्यासाठी शंभरावर कोरोना योध्यांच्या सहभागाने हा ड्राय रन घेण्यात आला. त्यानुसार लस देण्याची प्रक्रीया होणार आहे.

ही बातमी पण वाचा : जगभरातून ‘मेड इन इंडिया ‘ लसींला ‘डिमांड’

रूग्णलयांतील तीन कक्ष आहेत, यात एका कक्षात कोरोना योध्यांचे ओळखपत्र तपासणी होईल दुसऱ्या कक्षात लसीकरण होईल. तिसऱ्या कक्षात संबधीत योध्याला विश्रांती देण्यात येणार आहे. अशा तिन टप्प्यांमध्ये आरोग्य विभागाचे डॉक्टर्स व वैद्यकीय कर्मचारी लसीकरण करतील. या लसीकरण कामकाजाची अंतिम नियोजना संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक सुरू आहे.यात किती टप्प्यात मध्ये किती लोकांपर्यंत लस दिली जाणार याची माहिती घेतली जात आहे.

या लसीकरणासाठी पहिल्या टप्प्यात शासकीयस्तरावर काम करणारे कोरोना योद्धे त्याचबरोबर स्वयंसेवी संस्था व कोरोना संसर्ग टाळण्यासाठी जेजे घटक कार्यरत आहेत. अशांना लस प्राधान्याने देण्यात येणार आहे. त्यासाठी 25 हजार व्यक्तींची नाव नोंदणी व सर्वेक्षण झाले आहे. येत्या पंधरा दिवसातच लसीकरण कोल्हापूर जिल्ह्यात बहुतांशी ठिकाणी पूर्ण क्षमतेने होईल अशी तयारी आरोग्य विभागाने केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER