सिधी बस दुर्घटना : बस ३० फूट खोल कालव्यात कोसळली; ३६ प्रवाशांचा करुण अंत

36-dead-as-bus-falls-into-canal-in-madhya-pradesh

भोपाळ :- मध्यप्रदेशातील (MP News) सिधीमध्ये बस (Sidhi Bus accident) ३० फूट खोल कालव्यात कोसळून झालेल्या भीषण अपघातात ३६ प्रवाशांना (36-dead) प्राण गमवावे लागले आहेत. बसमध्ये जवळपास ६० प्रवासी होते. आतापर्यंत सात प्रवाशांना वाचवण्यात यश आले आहे.

घटनास्थळी बचावकार्य वेगाने सुरू असून अद्याप काही प्रवासी बेपत्ता आहेत. सकाळी ७.३० वाजताच्या सुमारास ही बस सतनाच्या दिशेने जात असताना अपघात झाला. ओव्हरटेक करण्याच्या नादात बस कालव्यात पडल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान (Shivraj Singh Chouhan) यांनी मृतांच्या वारसांना प्रत्येकी पाच लाख रुपयांच्या भरपाईची घोषणा केली आहे. तर उर्वरित प्रवाशांचा कालव्यात शोध घेण्याचा प्रयत्न सुरू आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER