कोल्हापुरात व्दिशतक : दिवसभरात 36 पॉझिटिव्ह

Coronavirus

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात गुरूवारी दिवसभरात 36 कोरोना बाधित रुग्ण आढळले. तर 1411 लोकांचा अहवाल निगेटिव्ह आला. कोल्हापुरातील एकुण रुग्ण संख्या 218 वर पोहोचली. त्यामध्ये सर्वाधिक शाहूवाडीत 69 रुग्ण आढळले आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी सी केम्पी-पाटील यांनी आज दिली.
आज दिवसभरात आलेल्या 36 पॉझीटिव्ह अहवालामध्ये आजरा-1, भुदगरड-4, चंदगड-7, गगनबावडा-2, राधानगरी-1, शाहूवाडी-15 आणि महानगरपालिका क्षेत्रात-6 असा समावेश आहे.

आजअखेर तालुका, नपा आणि मनपा क्षेत्रनिहाय रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे – आजरा- 11, भुदरगड- 22, चंदगड- 13, गडहिंग्लज- ५, गगनबावडा- 4, हातकणंगले- 1, कागल- 1, करवीर- 10, पन्हाळा- 13, राधानगरी- 35, शाहूवाडी- 69, शिरोळ- 4, नगरपरिषद क्षेत्र- 7, कोल्हापूर महापालिका क्षेत्र-19 असे एकूण 214 आणि पुणे-1, कर्नाटक-२ आणि आंध्रप्रदेश-1 इतर जिल्हा व राज्यातील चौघे असे मिळून एकूण 218 रुग्णांची आजअखेर जिल्ह्यात संख्या आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला