शेतकरी आंदोलनाला ३६ ब्रिटिश खासदारांचा पाठिंबा; यूकेच्या सचिवांना लिहिले पत्र

protest

लंडन :- भारतात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला ब्रिटनमधील ३६ खासदारांनी पाठिंबा दिला आहे. लेबर पार्टीचे खासदार तनमनजित सिंग धेसी यांच्या नेतृत्वाखाली ३६ ब्रिटिश खासदारांनी यूकेचे सचिव डोमिनिक राब यांना याबाबत पत्र लिहिले आहे. त्यांनी कृषी कायद्यांविरोधात भारतावर दबाव टाकण्याची मागणी केली आहे. खासदारांच्या गटाने रॉब यांना म्हटलं की, त्यांनी पंजाबच्या शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ परराष्ट्र मंत्रालय आणि यूकेच्या कार्यालयांमार्फत भारत सरकारशी चर्चा करावी.

तनमनजित सिंग म्हणाले, “गेल्या महिन्यात अनेक खासदारांनी मला व लंडनमधील भारतीय उच्चायोगाला भारतातील शेतकऱ्यांचे शोषण करणाऱ्या तीन कृषी कायद्यांबाबत लिहिले होते. केंद्र सरकारने कोरोनाच्या (Corona) काळात आणलेले हे तीन कृषी कायदे शेतकऱ्यांचे शोषण थांबवणे आणि त्यांच्या पिकांना योग्य मोबदला देण्यास अपयशी ठरल्याबद्दल देशभरात शेतकरी निषेध आंदोलन करत आहेत.

हा विषय ब्रिटनमधील शीख आणि पंजाबशी निगडित असलेल्या लोकांसाठी विशेष चिंतेचा विषय आहे. हा कायदा भारतातील इतर राज्यांसाठीही अडचणीचा ठरत आहे. अनेक ब्रिटिश शीख आणि पंजाबी लोकांनी आपल्या खासदारांसोबत या प्रकरणी आवाज उठवला आहे. कारण पंजाबमधील त्यांच्या कुटुंबीयांना याची झळ बसणार आहे.

केली होती ऑनलाईन बैठक

या कायद्यांविरोधात २८ नोव्हेंबर २०२० रोजी तनमनजित सिंग यांनी ऑल पार्टी पार्लिमेंटरी ग्रुप फॉर ब्रिटिश शीख यांची ऑनलाईन बैठक बोलावली होती. यामध्ये १४ खासदाारांनी भाग घेतला. तसेच ६० खासदारांनी सहभागी होऊ शकत नसल्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली होती. या बैठकीत ब्रिटिश सरकारने भारताशी चर्चा करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

या खासदारांनी दिले समर्थन

भारतातील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देताना ज्या ब्रिटिश खासदारांनी पत्रावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत. त्यामध्ये डेबी अब्राहम, मार्टिन डॉकर्टी ह्युजेस, एलन डोरांस, अँड्रूयू ग्वेने, अफजल खान, इयान लावेरी, इमा लावेरी, क्लाइव लेविस, टोनी लॉयड, खालिद महमूद, सीमा मल्होत्रा, स्टीव मैककेब, डॉन मैकडोनेल, पॅट मैकफेडेन, ग्राहम मोरिस, कार्लेइन नौर्स आदींचा समावेश आहे.

ही बातमी पण वाचा : कृषी कायद्याविरोधात पालघर जिल्ह्यात शेतकऱ्यांचे आंदोलन

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER