मंगल पांडेच्या ३५ वर्षाआधी या शिपायानं बंडाचं निशाण फडवलं होतं !

Mangal Pandey - Maharastra Today
Mangal Pandey - Maharastra Today

बहूतांश इतिहासाच्या पुस्तकांत इंग्रजांविरुद्धचं पहिलं स्वातंत्र्य युद्ध १८५७ चा उठाव असल्याचं लिहण्यात आलंय. तिथूनच भारताच्या स्वातंत्र्य लढ्याला सुरुवात झाल्याचं बोललं जातंय. इतिहासाचा सविस्तर आणि सखोल अभ्यास केला तर ही बाब तथ्य नसल्याचं प्रखर्षानं जाणवतं. इतिहासकारांबद्दल सांगायचं तर मंगल पांडेंच्या आधी असा क्रांतीकारी होऊन गेला ज्यानं भारतीयांच्या मनात क्रांतीचं बीज रोवलं. त्या स्वातंत्र्य सेनानीच नाव होतं ‘बिंदी तिवारी’!

इंग्रजांच्या क्रुरते विरुद्ध मंगल पांडेच्या ४ दशकाच्या आधी बिंदी तिवारीनं आवाज उठवला होता. ते वर्ष १८२४ आणि पहिलं इंग्रज विरुद्ध ब्रम्हदेशाचं युद्ध सुरु झालं होतं. १८२२ साली ब्रम्हदेशाच्या सैन्यानं मणिपूर आणि आसाममार्गे भारत घुसुन इंग्रजी सैन्याशी झुंज घेत होतं. अशात बंगालमध्ये एका सैन्य तुकडीला ब्रम्हदेशाच्या दिशेनं कुच करण्याचा आदेश मिळाला. या तुकडीतल्या सैन्यापैकी अनेकांना हे युद्ध लढायचं नव्हतं. यातली एक तुकडी बिंदी तिवारी यांची होती. बिंदी एक पुर्व उत्तरप्रदेशातले जवान होते. जे नंतर बंगाल आर्मीत तैनात करण्यात आलंय.

बैरकपुर पोहल्यानंतर शिपायांना जहाजातून ब्रम्हदेशात नेलं जाणार होतं. तिथून जहाज रंगूनकडे कुच करणार होतं. बैरकपूर जे आज चितगावं म्हणून ओळखलं जातं तिथपर्यंत चालत जाण्याचे आदेश सैन्याला देण्यात आले होते. ब्रिटीश सैन्यानं फक्त इंग्रज अधिकाऱ्यांसाठी बैलगाडीची व्यवस्था करण्यात आली होती. भारतीय सैन्याला चालत येण्याचे आदेश होते. शिवाय इंग्रजी अधिकाऱ्यांचं साहित्यसुद्धा त्यांना खांद्यावरुन वाहन्याचे आदेश देण्यात आले होते. या परिस्थीती भारतीय सैन्यानं इंग्रजांकडे मागणी केली की कमीत कमी त्यांचं सामान वाहून नेण्याची सुविधा मिळावी आणि युद्धात लढण्याचा भत्ता दुप्पट मिळावा परंतु इंग्रजांनी सैन्याची मागणी धुडकावून लावली.

बिंदी तिवारी यांनी हा अन्याय सहन न करण्याचं ठरवलं. ते फक्त भारतीय असल्यामुळं त्यांना अपमानित केलं जात होतं. त्यांनी काही साथीदारांना सोबत घेऊन जायला नकार दिला. इंग्रजांविरुद्ध पहिल्यांदा एखाद्या बटालियननं उठाव केला होता. इतर सैनिकांना देखील धीर आला. त्यांनी देखील नकार द्यायला सुरुवात केली. जेव्हा विद्रोहाची खबर ब्रिटीश कमांडर पर्यंत पोहचली तेव्हापर्यंत साऱ्याचं सैन्यानं उठावाचं शस्त्र उपसलं होतं. इतर सैन्य तुकड्याही बंड करुन उठल्या. परिस्थीतीचा अंदाज घेत कमांडरनं बिंदी तिवारीवर मागण्या मागं घेण्यास नकार दिला.

अशातच इंग्रजांनी बंड करणाऱ्या सर्व सैन्याला घेरलं. आणि त्यांच्यावर गोळ्या झाडायला सुरुवात केली. बिंदी आणि त्याच्या साथीदारांना याचा अंदाज देखील नव्हता. त्यांनी कोणता निर्णय घ्यायच्या आत इंग्रजांच्या बंदूकांनी स्वतःच्याच सैन्याच्या छातीची चाळण केली होती. अनेक सैनिकांनी हुबळी नदीत उडी घेतली. या हल्ल्यात अनेकांचा बळी गेला.

बिंदी तवारीचं शव इंग्रज अधिकाऱ्यांनी साखळीला बांधून अनेक दिवसांसाठी पिंपळावर लटकावलं होतं. ब्रिटीशांना ही चेतावनी द्यायची होती की परत कुणी अशी कृती केली तर त्यांच्यावर ही अशीच कारवाई करण्यात येईल. परत सैन्यानं विद्रोह करु नये म्हणून इंग्रजांनी ही कारवाई केली होती.

इंग्रज अधिकाऱ्याची ही क्रुरता सर्व सैन्याच्या तुकडीपर्यंत पोहचली. इथून ब्रिटीश सैन्याच्या पतनाला सुरुवात झाली. ब्रिटीशांसाठी काम करणाऱ्या भारतीय अधिकाऱ्यांनी नोकरी सोडली. ब्रिटीशांची भारतीयांप्रति असणारी घृणा ठळकपणे जाणवू लागली. इंग्रजांना सर्वात मोठा धक्का तेव्हा बसला जेव्हा सैनिकांनी राजीनामे द्यायला सुरुवात केली.

जिथं बिंदी तिवारी यांचं शव लटकावण्यात आलं होतं. ते लोकांसाठी तिर्थस्थान बनलं. कर्नल बिंदी तिवारी यांच्या नावाची प्रतिमा तिथं बसवण्यात आलीये. आजही लोक तिथं भेट देऊन बिंदी यांच्या शौर्याला नमन करतात. इतिहास भलेही बिंदी तिवारींना स्थान मिळालं नसेल पण पश्चिम बंगाल आणि बांग्लादेशात त्यांच नाव शौर्याचा समानअर्थी शब्द म्हणून घेतलं जातं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button