पुणे शिक्षक मतदारसंघात आमदारकीसाठी ३५ शिक्षक मैदानात

election

कोल्हापूर : पुणे विभागीय शिक्षक मतदारसंघामध्ये आमदारकीसाठी ३५ शिक्षक निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. यामध्ये ३१ उमेदवारांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवित आहेत. महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे प्रा.जयंत दिनकर आसगावकर (कोल्हापूर), महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विद्यानंद माणिकराव मानकर (पुणे), लोकभारती पक्षाकडून जी. के. उर्फ गोरकनाथ किसन थोरात (पुणे) आणि वंचित बहुजन आघाडीकडून सम्राट विजयसिंह शिंदे (शिराळा,सांगली) तर भाजप पुरस्कृत महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे जितेंद्र पवार (मजरेवाडी सोलापूर) निवडणुकीच्या रिंगणात आहेत. विद्यमान आमदार दत्तात्रय सावंत (आंबे पंढरपूर) हे अपक्ष म्हणून पुन्हा निवडणूक लढवित आहेत. राज्य शाळा कृती समितीमध्ये यंदा फूट पडल्यामुळे विद्यमान आमदारांची डोकेदुखी वाढली आहे.

सुटा’चे प्रा.सुभाष जाधव, ज्येष्ठ विचारवंत डॉ. राजेंद्र कुंभार, टॅफनॅफ’चे उमेदवार प्रा. नितीन पाटील ही मंडळी अपक्ष म्हणून निवडणूक लढवित आहेत. पुणे शिक्षक मतदारसंघातून एकूण ५० उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. मंगळवारी अर्ज माघारीच्या दिवशी १५ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. आता ३५ उमेदवार रिंगणात आहेत. महाविकास आघाडीचे उमेदवार प्रा. जयंत आसगावकर व भाजप पुरस्कृत शिक्षक परिषदेचे उमेदवार जितेंद्र पवार यांच्यासाठी काँग्रेस आणि भाजपच्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

अपक्ष उमेदवार

अपक्ष उमेदवार म्हणून अभिजित वामनराव बिचुकले (सातारा), उमेश निवृत्ती मुंढे (सुभाषनगर बार्शी), करणसिंह सुरेशराव सरनोबत (आसुर्ले कोल्हापूर), चाणक्यकुमार अमरेशा झा (तळवडे पुणे) सुभाष आत्माराम जाधव (समता कॉलनी कोल्हापूर), तानाजी मारुती नाईक (साई कॉलनी हुपरी) दत्तात्रय सावंत, कोरेगाव (पुणे), सचिन मारुती नागटिळक (माढा), नितीन पाटील (कोल्हापूर), नंदकिशोर बबनराव गायकवाड (आगळगाव बार्शी), प्रकाश मारुती पवार (सिंहगड रोड पुणे), प्रा. प्रकाश राजाराम पाटील (सिंहगड रोड पुणे), बाळासाहेब उर्फ गंगाधर जगन्नाथ गोतारणे (पिंपरी पुणे), नेमीनाथ धनपाल बिरनाळे (वसंतनगर सांगली), महादेव रामचंद्र माने (धानोरी पुणे), मेहरु भवानी क्षेत्री (परिते. ता माढा ), सुनील विष्णू मोरे ( शास्त्रीनगर पुणे), रतन मुकुंदराव पाटील (तांबवे, ता.वाळवा), प्राचार्य राजेंद्र कुंभार (जयसिंगपूर, कोल्हापूर), रेखा दिनकर पाटल (कात्रज पुणे), रेश्मा ऋतुराज नलावडे (धोलवड, ता. जुन्नूर), विशाल शंकरराव देवरे (पुणे), सत्यजित लिंबा जानराव (पांगरी, ता. बार्शी),सर्जेराव रामचंद्र जाधव (श्रीपूर, ता. माळशिरस),सिताराम दुंदा भोसले (सुरुल,ता. वाळवा), सुधीर सुर्यकांत विसापुरे (सातारा),सुरेश नारायण वाघमारे (धनकवडी पुणे), रविंद्र चंदर सोलनकर (शेगाव, ता. जत), संतोष शमुवेल फाजगे (पुणे) यांचा समावेश आहे.

कोल्हापूरचे उमेदवार

महाविकास आघाडीकडून प्रा. जयंत आसगावकर,अपक्ष उमेदवार ‘टॅफनॅफ’चे प्रा. नितीन पाटील, प्राचार्य राजेंद्र कुंभार, प्रा. सुभाष जाधव, प्रा. तानाजी नाईक, करणसिंह सरनोबत हे उमेदवार रिंगणात आहेत. कोल्हापुरातून एकच उमेदवार देण्यासाठी प्रयत्न झाले. त्या प्रयत्नातून शिक्षक नेते दादासाहेब लाड, शाळा कृती समितीचे बाबासाहेब पाटील, विनाअनुदानित कृती समितीचे खंडेराव जगदाळे, संभाजीराव खोचरे, शिवाजी विद्यापीठातील वनस्पतीशास्त्र विभागातील प्रा. मानसिंगराज निंबाळकर यांनी उमेदवारी मागे घेतली. दरम्यान जनसुराज्य शक्ती पक्षाचे जिल्हा परिषद सदस्य प्रा. शिवाजी मोरे यांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER