कोरोना काळात इमर्जन्सी पॅरोलवर बाहेर आलेले तिहार जेलचे ३४६८ कैदी गायब

नवी दिल्ली :- कोरोनामुळे तुरुंगात गर्दी होऊ नये आणि कोरोनाचा प्रसार होऊ नये म्हणून अनेक कैद्यांना इमर्जन्सी पॅरोलवर सोडण्यात आले होते. दिल्लीच्या तिहार जेलमधून ६ हजार ७४० कैद्यांची इमर्जन्सी पॅरोलवर सुटका केली होती. यापैकी ३ हजार ४६८ कैदी बेपत्ता आहेत. ते सध्या कुठे आहेत, याची कोणतीही माहिती पोलिसांना अद्यापही मिळाली नाही. त्यामुळे तिहार जेलच्या प्रशासनाने या कैद्यांना पकडण्यासाठी दिल्ली पोलिसांकडे मदत मागितली आहे.

तिहार जेलच्या काही कैद्यांनी सरेंडर केले आहे तर काही कैदी गायब आहेत. यापैकी काही कैद्यांना न्यायालयाचा नियमित जामीन मिळाला असल्याने त्यांनी प्रशासनासमोर सरेंडर केले नाही. त्यामुळे आता गायब असलेल्या या कैद्यांना कसे पकडायचे हा प्रश्न तिहार जेल प्रशासन आणि दिल्ली पोलिसांसमोर आहे. सध्या गायब असलेल्या कैद्यांचे तपस सुरू आहे.

गेल्या वर्षी देशभरात कोरोनाला रोखण्याचे मोठे आव्हान होते. तिहारमध्येही मोठ्या संख्येने कैदी एकत्र राहत असल्याने त्यांच्यामध्ये कोरोनाचा (Corona) प्रसार होण्याची शक्यता होती. त्यामुळे कैद्यांना इमर्जन्सी पॅरोल सोडण्याचा आदेश देण्यात आला होता. मात्र, यामधील ३ हजार ४६८ कैदी गायब आहे.

दिल्लीतील तिहार जेलच्या ६८ पेक्षा अधिक कैदी आणि १० पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये तुरुंग अधीक्षक तसेच जेलमधील दोन डॉक्टरांचाही समावेश आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button