अजितदादांच्या पुण्यात चाललंय तरी काय? जम्बो कोविड सेंटरमधून तरुणी बेपत्ता

- रुग्णालयाबाहेर नातेवाईकांचे उपोषण

Ajit Pawar- pune-jumbo-covid-centre

पुणे : कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर 33 वर्षीय प्रिया गायकवाड (Priya Gaikwad) या महिलेला तिच्या आईने पुण्यातील जम्बो कोविड सेंटरमध्ये दाखल करण्यात आले होते . मात्र कोरोना पॉझिटिव्ह (Corona Positive) तरुणी कोव्हिड सेंटरमधून (Covid Center) बेपत्ता झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.

माहितीनुसार , ससून रूग्णालयातून याठिकाणी दाखल झालेल्या या रूग्ण महिलेवर उपचार सुरू असल्याचे कोविड सेंटरतर्फे सुरूवातीला सांगण्यात आले . मात्र, बरी झालेल्या प्रिया गायकवाड यांना जम्बो कोविड सेंटरमधून घरी घेऊन जाण्यासाठी गेलेल्या आईला ‘तुमची मुलगी येथे नव्हती’, अशी धक्कादायक माहिती देण्यात आली. नंतर संतप्त नातेवाईकांनी रुग्णालयाविरोधात आमरण उपोषणाचा मार्ग निवडला आहे. बेपत्ता तरुणीची आई रागिणी सुरेंद्र गमरे यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे.

जम्बो कोविड सेंटर येथून बेपत्ता झालेल्या प्रिया गायकवाड यांचा घातपात झाल्याचा संशय तिच्या नातेवाईकांनी वर्तवला आहे. माझी मुलगी कुठे आहे? असा सवाल रागिणी गमरे यांनी प्रशासनाला केला आहे.

ससून रूग्णालयातून रुग्णवाहिकेमधून कोविड सेंटरमध्ये माझ्या मुलीला जम्बो कोविड सेंटरमध्ये दाखल करण्यात आलं होतं. दरम्यानच्या काळात तिच्यावर उपचार सुरू असल्याचे संबंधितांकडून सांगण्यात आले होते. मात्र, आता मुलीला घरी परत नेण्याची वेळ आली तेव्हा ती कोविड सेंटरमध्ये नसल्याचे सांगण्यात येत आहे, असेही गमरे म्हणाल्या .

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER