२४ तासात मुंबईत कोरोनाग्रस्त ३२ रुग्णांचा मृत्यू

मुंबई : राज्यात आज दिवसभरात १०५ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर दिवसभरात तब्बल २ हजार १९० नव्या कोरोना रुग्णांची भर पडली आहे. आज झालेल्या १०५ मृत्यूपैकी मुंबईचे ३२ रुग्ण आहेत.

मुंबईत दिवसभरात १ हजार २ नवीन कोरोना रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या ही ३२ हजार९७४ वर पोहोचली आहे. तर आज दिवसभरात ३९ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे मुंबईतील कोरोनाबळींची संख्या १ हजार ६५ वर पोहोचली आहे. तर आज ४१० जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आतापर्यंत मुंबईत ८ हजार ८१४ जणांनी कोरोनावर मात केली आहे.

Check PDF


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER