क्रिकेट कसोटीत ३१,२५८ चेंडूंचा सामना; द्रविडचा विक्रम

Rahul Dravid

मुंबई : भारताचा माजी कर्णधार, दिग्गज फलंदाज राहुल द्रविड याने क्रिकेट कसोटीत एकूण ३१,२५८ चेंडूंचा सामना केला. हा विक्रम आहे. राहुलशिवाय इतर कोणत्याही फलंदाजाने आतापर्यंत ३० हजारांपेक्षा जास्त चेंडूंचा सामना केला नाही. प्रत्येक सामन्यात राहुलने सरासरी १९०.६ चेंडूंचा सामना केला.

जगातल्या सर्वोत्तम फलंदाजांमध्ये राहुलची गणना होते. दिग्गज गोलंदाजांना घाम फोडणाऱ्या द्रविडचे जगभर चाहते आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद अर्थात आयसीसीदेखील राहुल द्रविडच्या फलंदाजीची ‘फॅन’ झाली आहे. आयसीसीने राहुल द्रविडचा हा विक्रम शेअर करत त्याचे कौतुक केले आहे.

असा विक्रम करणारा राहुल द्रविड जगातला पहिलाच फलंदाज आहे. आयसीसीने त्यांच्या ट्विटरवर लिहिले की, “राहुलने कसोटी क्रिकेटमध्ये ३१,२५८ चेंडूंचा सामना केला आहे. क्रिकेटच्या इतिहासामध्ये हा एक जागतिक विक्रम आहे. राहुलशिवाय इतर कोणत्याही फलंदाजाने आतापर्यंत ३० हजारांपेक्षा जास्त चेंडूंचा सामना केला नाही. त्याने प्रत्येक कसोटी सामन्यात सरासरी १९०.६ चेंडूंचा सामना केला आहे.”

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER