झोपडपट्टी हटविण्याच्या विरोधात ३० हजार झोपडपट्टी धारकांनी केला रास्ता रोको आंदोलन

kalwa slum andolan

ठाणे : ठाणे महानगर पालिकेच्या वतीने कालवा खाडी क्षेत्रातील जवळपास ३० हजार झोपडयांना तोडण्याची कारवाई करण्यात आली. या कारवाईच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वात आज ३० हजार नागरिकांनी कलवा रोडवर रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. ठाणे महानगर पालिका फक्त कालवा खाडी क्षेत्रातील झोपडपट्ट्यानां केंद्रित करीत असल्याचा आरोप आव्हाड यांनी केला आहे.

झोपडपट्ट्या तोडण्याच्या कारवाईला सत्ताधारी भाजप आणि शिवसेनेच्या नगरसेवकांनी पालिकेच्या दोन आठवड्यापूर्वी झालेल्या आमसभेत सहमती दिली असली तरी, विरोधी पक्ष्याच्या नगरसेवकांनी मात्र याला विरोध दर्शविला आहे. या कारवाईत शांतीनगर, जानकी नगर आणि जय भीम नगरातील झोपडपट्ट्या तोडण्यात येणार आहे.

सत्तेत असलेल्या भाजप आणि शिवसेनेच्या नगरसेवकांना या भागातून लोकांची मते मिळत नसल्याने त्यांनी या कारवाईला सहमती दिली आहे. तसेच नगरसेवक प्रशासनाचे चमचे आहे असा आरोप आव्हाड यांनी केला आहे. ठाण्यातील ७२ टक्के जनता हि अवैध इमारतीत, झोपडपट्ट्यांमध्ये राहतात.

काही वर्षांपूर्वी वागळे इस्टेट झोपडपट्टी तोडण्याचा प्रश्न उद्धवला तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस चे नेते शरद पवार यांनी स्वतः पुढाकार घेत, या कारवाईचा विरोध केला होता. आणि विधानपरिषदेत या कारवाईला स्थगिती देण्यात आली होती. तरीही ठाणे महानगर पालिका झोपडपट्ट्यानां तोडण्याची कारवाई कशी करत आहे, असा प्रश्नही आव्हाड यांनी यावेळी उपस्थित केला.