२० पेक्षा कमी विद्यार्थिसंख्या असलेल्या राज्यातील ३०५ शाळा बंद होणार

Schools

मुंबई :- २० पेक्षा कमी विद्यार्थिसंख्या असलेल्या राज्यातील तब्बल ३०५ शाळा बंद करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. या निर्णयाला शिक्षक संघटनांनी विरोध केला आहे. मागील सरकारच्या काळातील शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी असाच पटसंख्येमुळे शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी त्या निर्णयाला विरोध केला होता.

शेतकरी कर्जमाफीची दुसरी यादी 28 फेब्रुवारी रोजी

केंद्र शासनाच्या नियमानुसार वय ६ ते ११ वयोगटातील किमान २० बालकांसाठी शाळा स्थापन करण्याचेही नमूद आहे. त्याचप्रमाणे बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क कायदा २००९ नुसार इयत्ता पहिली ते पाचवीमध्ये शिकणाऱ्या बालकांच्या वस्तीलगत एक किलोमीटरपर्यंत शाळा उपलब्ध करणे बंधनकारक आहे. त्याच वेळी लहान वस्तीतील बालकांना शिक्षण देण्यासाठी वाहतूक भत्ता व सुविधा उपलब्ध करून देण्याचीही तरतूद आहे.

या शाळा बंद करून वाहतूक व्यवस्था सुरू करा, असे कपिल सिब्बल यांच्या कार्यकाळात केंद्र सरकारचे निर्देश होते. शाळा चालवायला डोके लागते असे स्वतः शरद पवार म्हणाले होते. आता तुमच्या सरकारला बंद करण्याची अक्कल कोणी दिली कळेल का? आम्ही शाळा बंद केल्या नव्हत्या. फक्त कमी विद्यार्थी असलेल्या शाळेतून जवळच्या शाळेत विद्यार्थी पाठवले होते. आता गरीब मुलांच्या ८५० शाळा बंद करायला कोणती अक्कल लागते हे या सरकारने स्पष्ट करावे- असे विनोद तावडे यांनी म्हटले आहे. जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांच्या भवितव्याची वाट लावण्याचे काम ठाकरे सरकार करत असल्याचा आरोपही त्यांनी केला.


Web Title : 305 schools in the state will be closed whose less than 20 students

(Maharashtra Today : Latest and breaking marathi news from Mumbai City, Nagpur City, Thane City, Pune City, Aurangabad City, Kolhapur City, Sangli City, Ratnagiri City, Nanded City and all other cities of Maharashtra.)