३०० वर्षांचा वड विस्तारला साडेतीन एकरात !

300 Year Old Banyan Tree

नवी दिल्ली : पंजाबच्या फतेहगढ साहिब जिल्ह्यातील एका गावात वडाचे ३०० वर्षे जुने झाड आहे. हे साडेतीन एकरात पसरले आहे. या झाडाच्या आश्रयाने अनेक पक्षी, प्राणी आणि जंगली जीवही राहतात.

झाडामुळे गावाची ओळख
या झाडामुळे फतेहगढ साहिब जिल्ह्याच्या चोल्टी गावाला फक्त देशातच नाही, तर जगभरात ओळख मिळवून दिली आहे. गावातले लोक या झाडाची खूप काळजी घेतात. या वडामुळे इथली जैवविविधता टिकून आहे.

आश्रयस्थान
पंजाबच्या बहुतेक भागांमधून लुप्त होत असलेल्या मोर, घुबड, साप, मॉनिटर पाल, बागेतली पाल, किडे, मिलिपीड अशा अनेक प्रजातींचा या झाडावर निवास आहे. गावाच्या पंचायतीने या कल्पवृक्षाच्या जागेला ‘जैवविविधता हेरिटेज साईट’ घोषित करण्याचा प्रस्ताव मंजूर केला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button