चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या ३०० कोळी बांधवांना मिळाली ‘देवेंद्रभेट’

मुंबई : तौक्ते वादळामुळे (Toukate Cyclone) मुंबईच्या मालाड पश्चिम मढ येथील कोळी बांधवांच्या बोटींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. येथील सुमारे ३०० कोळी बांधवांना उत्तर मुंबईचे भाजपा खासदार गोपाळ शेट्टी यांच्या हस्ते देवेंद्रभेट म्हणून अन्नधान्याचे वाटप करण्यात आले. भारतीय जनता युवा मोर्च्याचे अध्यक्ष तेजिंदर सिंग तिवाना यांनी मुंबईत देवेंद्रभेट (devendra-gift) हा उपक्रम सुरू केला आहे.

या प्रसंगी खासदार गोपाळ शेट्टी म्हणाले की, नुकसानग्रस्त कोळी बांधवांना पंतप्रधान नरेंद्र मोदी व राज्य सरकारकडून लवकरच मदत मिळणार आहे. परंतु त्यांची रोजीरोटी गेल्याने त्यांना त्वरित दिलासा देण्यासाठी ‘देवेंद्रभेट’ म्हणून अन्नधान्य उपलब्ध करून देण्यात येत आहे. या वादळात मच्छिमार बोटींचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे जनसेवा बँकेचे अध्यक्ष जयप्रकाश मिश्रा यांच्या संकल्पनेतून येथील कोळी बांधवांना कमी व्याजाने कर्ज उपलब्ध करून देण्यात येईल. त्यांची मासेमारी सुरू झाल्यानंतर पुढचे सहा महिने बँकेचे हप्ते घेतले जाणार नाहीत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button