30 Jan Special : कपिलदेवने रचला होता इतिहास; सर रिचर्ड हॅडलीच्या रेकॉर्डशी केली होती बरोबरी

टीम इंडियाचे माजी कर्णधार कपिलदेव (Kapil Dev) यांनी अनेक विक्रम केले आणि मोडले आहेत. २७ वर्षांपूर्वी या क्रिकेट जादूगाराने एक नवा इतिहास लिहिला होता. भारताला १९८३ मध्ये विश्वविजेता बनवणाऱ्या कपिलदेवसाठी ३० जानेवारी हा खास दिवस आहे. कपिलने आजच्या दिवशी १९९४ मध्ये सर रिचर्ड हॅडलीच्या (Sir Richard Hadley) ४३१ कसोटी विकेटच्या विक्रमाची बरोबरी केली होती. श्रीलंकेविरुद्ध बंगळुरूमध्ये झालेल्या सामन्यात कपिलने डॉन अरुणाश्रीच्या विकेटने हा पराक्रम केला.

भारताने एकतर्फी जिंकला होता सामना

या सामन्यात भारताने श्रीलंकेला पराभूत केले होते. या सामन्याच्या पहिल्या डावात भारताने ५४१ ही मोठी धावसंख्या उभारली होती. त्यास उत्तर म्हणून श्रीलंकेचा संपूर्ण संघ २३१ धावांवर बाद झाला. पहिल्या डावात भारताने श्रीलंकेला फॉलोऑन खेळण्यास भाग पाडले आणि त्यानंतर श्रीलंकेचा डाव २१५ धावांत संपुष्टात आला. अखेर भारताने हा सामना एक डाव आणि ९५ धावांनी आपल्या नावावर केला.

अझरुद्दीनचे पहिल्याच डावात शतक

श्रीलंकेविरुद्धच्या या विजयात भारताच्या फलंदाजांची भूमिका खूप महत्त्वाची होती. या सामन्यात कर्णधार मोहम्मद अझरुद्दीनने शानदार शतक झळकावले होते. त्याने १०८ धावांचा शानदार डाव खेळला. तर नवज्योत सिद्धू (९९) आणि सचिन तेंडुलकर (९६) यांनी शतके गमावली.

१९८३ : भारताने जिंकला वर्ल्ड कप

कपिलदेव भारतीय संघाचा कर्णधार होता. १९८३ मध्ये वेस्ट इंडिजला हरवून विश्वचषक जिंकला होता. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारताने १८३ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात वेस्ट इंडिजचा संपूर्ण डाव १४० धावांवर संपला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER