साखर उत्पादनात ३० टक्के वाढ

Sugar

पुणे : उसाच्या विक्रमी उत्पादनामुळे देशात साखरेच्या चालू हंगामात डिसेंबरअखेर गत उत्पादनाच्या तुलनेत तब्बल ३० टक्के जादा साखर उत्पादन नोंदविले गेले आहे. या उत्पादनाने नववर्षाला आरंभ होण्यापूर्वीच १०० लाख टनांचा टप्पा ओलांडला असून, उत्पादनवाढीचा हा वेग आणि गाळपासाठी उपलब्ध ऊस लक्षात घेता चालू हंगामअखेरीस साखर उत्पादन ३०० लाख टनांचा टप्पा लीलया ओलांडेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

भारतामध्ये चालू हंगामात ४८१ साखर कारखाने सहभागी झाले. ‘इस्मा’च्या माहितीनुसार ३१ डिसेंबरअखेर या कारखान्यांमध्ये ११० लाख २२ हजार टन साखर उत्पादित झाली. यामध्ये ३९ लाख ८६ हजार टन साखर उत्पादन करणारा महाराष्ट्र आघाडीवर आहे. देशामध्ये गतहंगामात ४३७ साखर कारखाने सहभागी झाले होते. या कारखान्यांत ३१ डिसेंबर २०१९ अखेर ७७ लाख ६३ हजार टन साखर उत्पादित झाली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER