महाराष्ट्रात दिवसभरात ३ हजार ९९४ नवे कोरोना रुग्ण

Maharashtra Coronavirus

मुंबई :- महाराष्ट्रात (Maharashtra) आज दिवसभरात ४ हजार ४६७ कोरोना (Corona) रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट हा ९४.१७ टक्के इतका झाला आहे. आज राज्यात ३ हजार ९९४ नवे कोरोना रुग्ण (Corona Patient) आढळले आहेत. तर राज्यात आज ७५ मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यू दर २.५७ टक्के इतका आहे. महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.

राज्यात ६० हजार ३५२ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. आज राज्यात ३ हजार ९९४ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. राज्यातील १८ लाख ८८ हजार ७६७ झाली आहे. आज नोंद झालेल्या एकूण ७५ मृत्यूंपैकी ४८ तासांपैकी १७ मृत्यू हे मागील आठवड्यातील आहेत. उर्वरित १७ मृत्यू हे एक आठवड्यापेक्षा अधिक कालवाधीपूर्वीचे आहेत. हे १७ मृत्यू ठाणे-९, यवतमाळ-२, अमरावती-१, औरंगाबाद-१, नागपूर-१, सातारा-१ आणि सोलापूर-१ असे आहेत.

Check PDF : प्रेस नोट १८ डिसेंबर २०२०

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER