जम्मू काश्मीर-पंजाब सीमारेषेवर 3 दहशतवाद्यांना अटक

3 terrorists arrested on Jammu and Kashmir

जम्मू काश्मीर : जम्मू काश्मीर पोलिसांनी तीन दहशतवाद्यांना अटक केली आहे. पंजाबजवळील लखनपूर येथून गुरुवारी सकाळी ही अटक करण्यात आली आहे. लखनपूर येथे पोलिसांनी ट्रक तपासणीसाठी थांबवलं असता ही कारवाई करण्यात आली. पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दहशतवादी ट्रकमधून शस्त्रांची वाहतूक करत होते.

एका ट्रकमधून शस्त्रे घेऊन जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या दहशतवाद्यांकडून सहा एके-४७ रायफल्स जप्त करण्यात आल्या आहेत. ट्रक पंजाबमधील बामियाल येथून काश्मीरच्या दिशेने चालला होता.अशी माहिती जम्मू काश्मीरचे पोलिस महानिरीक्षक मुकेश सिंह यांनी दिली आहे.पोलीस याप्रकरणी अजून तपास करत असल्याचंही मकेश सिंह यांनी सांगितलं आहे. अटक करण्यात आलेल्यांची सध्या चौकशी सुरु असल्याची माहिती देण्यात आली आहे.