हवामान बदलाचा अंदाज देणारे राज्यातील ३ रडार नादुरुस्त!

3 radars in the state faulty For Forecasting - Maharashtra Today

मुंबई :- तौक्ते चक्रीवादळाचे थैमान सुरू असताना हवामानातील बदलाचा अचूक अंदाज व्यक्त करणाऱ्या राज्यातील ४ डॉप्लर रडारपैकी ३ नादुरुस्त असल्याचा आरोप हवामानतज्ञ किरणकुमार जोहरे यांनी केला आहे. रते म्हणालेत की, याबाबत पंतप्रधान आणि मुख्यमंत्री कार्यालयाला सूचित केले आहे. तौक्ते वादळासारख्या आपत्कालीन परिस्थितीत यंत्रणा काम करत नसेल तर हाहा:कार माजू शकतो. अरबी समुद्रात अतितीव्र चक्रीवादळ सक्रिय असताना आयएमडीचे मुंबई रडार बंद असल्याचे उघड झाले आहे. मुंबई रडार बंद पडले असल्यास ऐन चक्रीवादळाच्या धोक्यादरम्यान रत्नागिरी ते पालघर आणि नाशिक ते सातारा या पट्ट्यातील हवामानाचे अचूक अंदाज मिळने कठीण आहे. अशा परिस्थितीमध्ये फक्त सॅटेलाईट इमेजवर अवलंबून राहावे लागणार आहे.

हे रडार बंद असल्याने रविवारी दुपारी १ वाजून २६ मिनिटांनंतर कोणतीही अपडेट आलेली नवहती. मात्र, संध्याकाळी सातच्या सुमारास मुंबई रडारच्या इमेजेस आयएमडीने पुन्हा खुल्या केल्या. तरीही, रडार योग्य प्रकारे काम करत नाही हे स्पष्ट दिसते आहे. सध्या राज्यात असलेल्या परिस्थितीत समोर आलेली ही माहिती धक्कादायक आणि चिंताजनक आहे.

[button color="" size="" type="square_outlined" target="" link=""]Disclaimer:-बातमीत एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. महाराष्ट्र टुडेच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व महाराष्ट्र टुडे स्वीकारत नाही.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला
MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button