३ क्विंटल गव्हाला १ तोळा सोन्याचा भाव मिळावा – राकेश टिकैत

rakesh tikait

नवी दिल्ली : गव्हाची किंमत सोन्याच्या किंमतीशी जोडताना शेतकरी आंदोलनाचे नेते राकेश टिकैत (Rakesh Tikait) यांनी मागणी केली की, तीन क्विंटल गव्हाला १ तोळा सोन्याचा भाव मिळाला पाहिजे. हा ‘टिकैत फार्मुला’ देशात लागू करा, अशी मागणी त्यांनी केली.

केंद्राने केलेल्या नव्या शेतकरी कायद्याच्या विरुद्ध सुमारे अडीच महिन्यांपासून दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाचे नेतृत्व टिकैत करत आहेत. शेतीमालाच्या किमान आधारभूत किंमती (एमएसपी ) बाबत एका वृत्तवाहिनीशी बोलताना राकेश टिकैत यांनी शेती मालाची किमान आधारभूत किंमत महेंद्रसिंह टिकैत यांचा फॉर्म्युलाप्रमाणे असावी अशी मागणी केली. राकेश टिकैत म्हणालेत, १९६७ मध्ये सरकारने शेतीमालाच्या किमान आधारभूत किंमती निश्चित केल्या तेव्हा गव्हाची किंमत ७६ रुपये क्विंटल होती. प्रायमरी शाळेतील शिक्षकाचा पगार ७० रुपये महिना होता. शिक्षक त्याच्या महिन्याच्या पगारात १ क्विंटल गहू खरेदी करू शकत नव्हता. आम्ही एक क्विंटल गहू विकून अडीच हजार वीट खरेदी करू शकत होतो. तेव्हा सोन्याची किंमत २०० रुपये तोळा होती. ३ क्विंटल गहू विकून १ तोळा सोन विकत घेता येत होत. आता आम्हाला ३ क्विंटल गव्हाच्या बदल्यात १ तोळा सोन मिळेल त्या हिशेबाने शेतीमालाची आधारभूत किंमत निश्चित करा.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER