तीन वर्षांत ३ लाख ८२ हजार बोगस कंपन्या केल्या बंद – अनुराग ठाकूर

नवी दिल्ली : सरकारने बोगस कंपन्या शोधून त्या बंद करण्याची विशेष मोहीम हाती घेतली आहे. ज्या कंपन्यांनी सलग दोन वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त काळ आर्थिक विवरणपत्र सादर केले नाही, अशा कंपन्या कंपनी कायद्यानुसार रद्द करण्यात आल्या आहेत, अशी माहिती केंद्रीय अर्थ आणि कंपनी व्यवहार राज्यमंत्री अनुराग ठाकूर (Anurag Thakur) यांनी राज्यसभेत एका प्रश्नाच्या उत्तरात दिली. गेल्या तीन वर्षांत सरकारने अशा ३ लाख ८२ हजार ५८१ कंपन्या बंद केल्या आहेत.

ते म्हणालेत – ‘शेल कंपनी’ या शब्दाची व्याख्या कंपनी कायद्यात नाही. जी कंपनी व्यावसायिकदृष्ट्‌या सक्रिय नाही किंवा जिची मालमत्ता लक्षात घेण्याजोगी नाही, जी कर बुडविणे, अवैध मार्गाने पैसे कमावणे, मालकी सुस्पष्ट नसणे बेनामी मालमत्ता इत्यादी प्रकारांसाठी वापरली जाते, अशा कंपन्यांना ‘शेल कंपनी’ असे म्हटले जाते.

‘शेल कंपन्यां’च्या विषयात लक्ष घालण्यासाठी सरकारने विशेष कृती दल (स्पेशल टास्क फोर्स) स्थापन केले असून त्यांनी अशा बोगस कंपन्या ओळखण्यासाठी एका ‘लाल निशाणा’च्या संकेताचा वापर करून अशा प्रकारच्या कंपन्यांचा धोका ओळखावा, अशी शिफारस केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER