दिवसभरात बलात्काराच्या ३ घटना, मोगलाई फोफावते आहे, चित्रा वाघ कडाडल्या

Uddhav Thackeray - Chitra Wagh

मुंबई : राज्यात एकाच दिवसात तीन वेगवेगळ्या ठिकाणी बलात्काराच्या घटना घडल्यात. यामुळे महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी या मुद्द्यावरुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना ट्विटरवर जाब विचरला. ट्विट केले – मुख्यमंत्री महोदय काय चालले आहे आपल्या राज्यात? ही शिवशाही नाही तर मोगलाई फोफावत आहे’. (Chitra Wagh on rape cases in Maharashtra).

चित्रा वाघ म्हणालात, कोल्हापूरात गर्भवती महिलेवर सामुहीक बलात्कार, औरंगाबादमध्ये ही सामुहीक बलात्काराची घटना, वाशिम मध्येही चालत्या खाजगी बसमध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार, आजच्या एका दिवसातल्या या तीन घटना आहेत. मुख्यमंत्री महोदय काय चाललंय आपल्या महाराष्ट्रात. ही शिवशाही नाही, ही तर मोगलाई फोफावतेय’.

कोल्हापुरात

कोल्हापुराच्या रायगड कॉलनीत एका गर्भवती महिलेवर पाच जणांनी वेगवेगळ्या ठिकाणी बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपींनी पीडित महिलेला आसामवरून गुंगीचे औषध देऊन कोल्हापूरात आणले. याप्रकरणी करवीर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी एका आरोपीला अटक केली असून इतर संशयितांचा शोध सुरु आहे.

औरंगाबादेत

सांस्कृतिक राजधानी अशी ओळख असलेल्या औरंगाबादेत वाराणसीहून आलेल्या एका अल्पवयीन तरुणीवर रेल्वे स्थानक परिसरात सामूहिक बलात्कार करण्याचा धक्कादायक प्रकार घडला. ही घटना रविवारी रात्री उशिराची आहे. या प्रकरणी उस्मानपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पीडित तरुणी वाराणसीवरुन आपल्या नातेवाईकांसोबत औरंगाबादेत आली होती. पण ही तरुणी रस्ता चुकली त्यामुळे तिची आणि नातेवाईकांची भेट होत नव्हती. त्यावेळी तरुणीला एकटं पाहून अज्ञातांनी रेल्वे स्थानक परिसरातच एका निर्जन स्थळी नेत तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. रात्री उशिरा घाटी रुग्णालयात पीडितेची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. पोलिसांनी तीन अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

वाशिममध्ये

गोंदियावरून पुण्याला जाणाऱ्या एका २४ वर्षीय तरुणीवर चालत्या बसमध्ये बलात्कार झाला. ६ जानेवारीला चालत्या खासगी बस ट्रॅव्हल्समध्ये विनयभंग करून वाशिमच्या मालेगाव परिसरात बलात्कार केल्याची घटना घडली. घटनेनंतर तरुणीचं मानसिक स्वास्थ खचले होते. पीडित तरुणीने पुण्यात पोहोचताच पोलिसांत तक्रार दिली.

आरोपीने पीडित तरुणीला सीट तुमची नाही असे सांगून मागच्या सीटवर बसवले आणि चाकूचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी देऊन बलात्कार केला. घटनेची वाच्यता केल्यास चालत्या गाडीतून फेकून देण्याची धमकी आरोपीने दिली.

याप्रकरणी पुणे पोलिसांनी वाशिम पोलिसांकडे गुन्हा वर्ग केला असून पोलिसांनी घडलेल्या घटनेमधील ‘गुडविल्स कंपनी’ची ट्रॅव्हल्स जप्त केली असून यातील आरोपी समीर देवकर आहे, असे पोलिसांनी सांगितले. घटनेचा तपास मालेगाव पोलीस करत आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER