जेएनपीटीवरील तीन महाकाय क्रेन कोसळल्या, जीवितहानी नाही

मुंबई : मुंबईतील जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट (Jawaharlal Nehru Port Trust) येथे बुधवारी तीन महाकाय क्रेन खाली कोसळल्या. याबाबत जेएनपीटीचे अध्यक्ष संजय सेठी (Sanjay Sethi) म्हणाले की, अति वेगाच्या वाऱ्यामुळे तीन मोठ्या क्रेन खाली कोसळल्या आहेत. आम्ही झालेल्या नुकसानीचे आकलन करीत आहोत. सुदैवाने मानवी जीवनाचे कोणतेही नुकसान झाले नाही.

सेठी म्हणाले की, उच्च-क्षमतेच्या क्रेनची किंमत सुमारे ११० कोटी रुपये आहे. अति वेगाचा वारा वाहू लागल्याने बरीच झाडे व विजेचे खांब पडले आहेत. गुरुवारी या नुकसानाचे मूल्यांकन केले जाईल.

मुंबई बंदरात काही शेडचे नुकसान झाले आहे, असे कार्यवाहक उपसभापती राजेंद्र पै बीर यांनी सांगितले. ते म्हणाले की, बंदरावर पाणी जमा झाले आहे. ते म्हणाले की, कार्यावर अंशतः परिणाम झाला आणि तेलाची वाहतूक सुरू आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER