आडात गुदमरून मरण पावलेल्या मुलाणी कुटुंबियांचे पालकमंत्र्यांंकडून सांत्वन

3-dies-due-exertion-well-ausa-latur Consolation by Guardian Minister

प्रतिनिधी । लातूर:औसा तालुक्यातील आलमला येथे आडातील गाळ काढताना आतील विषारी वायूने गुदमरून मुलाणी कुटुंबातील तिघा जणांचा मृत्यू झाला होता . जिल्ह्याचे पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी आज शनिवारी आलमला येथे भेट देऊन मुलाणी कुटुंबियांचे सांत्वन केले .

पाणीटंचाई असल्याने आडातील गाळ साफ करण्याचे काम सुरू होते . गाळ काढण्यासाठी पहिला व्यक्ती आत गेला .

तो परत न आल्याने इतर जण आत उतरले . यापैकी तिघांचा मृत्यू झाला होता . या दुर्घटनेत मुलाणी कुटुंबातील फारुख खुदबूद्दीन मुलाणी , सद्दाम फारुख मुलाणी आणि सय्यद दाऊद मुलाणी यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता .

पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी आलमला येथे भेट देऊन मुलाणी कुटुंबियांचे सांत्वन केले .घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी असून शासन मुलाणी कुटुंबियांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याची ग्वाही पालकमंत्र्यांनी यावेळी दिली . कुठल्याही प्रसंगात आणि सर्वतोपती मदत करण्याचे आश्वासन त्यांनी दिले .जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मिलिंद लातूरे , निलंगा पंचायत समितीचे सभापती अजित माने , किरण उटगे यांची पालकमंत्र्यांसमवेत उपस्थिती होती .