विदर्भ आणि किनारपट्टीभागात ३ दिवस पावसाचे

rain

मुंबई :- राज्यातील काही जिल्ह्यात १० ते १३ ऑगस्ट मुसळधार पाऊस (Heavy rain) पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. विदर्भ (Vidarbha) आणि किनारपट्टीजवळच्या (Coastal areas) भागांमध्ये मुसळधार पाऊस पडू शकतो. मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर कमी असेल तसेच मराठवाड्यात पावसाच्या हलक्या सरी बरसतील.

चार दिवसांपूर्वीही अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झाला आहे. पश्चिम महाराष्ट्रात झालेल्या मुसळधार पावसाने पूरस्थिती निर्माण होते की काय अशी स्थिती होती. मात्र पावसाचा जोर दोन दिवस ओसरल्याने स्थिती सावरली गेली.

आता पुढचे तीन दिवस किनारपट्टीजवळच्या भागांमध्ये पावसासाठी अनुकूल स्थिती निर्माण झाली आहे. पालघर, रायगड, रत्नागिरी (Ratnagiri) आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात पुढील तीन दिवस मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता आहे.

ही बातमी पण वाचा : कोल्हापूर ; पावसाचा जोर ओसरला : 60 बंधारे अद्याप पाण्याखालीच

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER