आयपीएल 2021 च्या 61 जागांसाठी 292 खेळाडू, लिलावासाठी यादी जाहीर

IPL 2021 PLAYER AUCTION LIST

आयपीएल 2021 (IPL 2021) च्या 18 फेब्रुवारीला होणाऱ्या लिलावासाठी (Auction list) उपलब्ध 292 क्रिकेटपटूंची यादी जाहीर करण्यात आली आहे. आयपीएलच्या अधिकृत पत्रकानुसार एकूण 1114 क्रिकेटपटूंनी या लिलावासाठी नोंदणी केली होती मात्र आठ फ्रँचाईजींनी त्यांच्या खेळाडूंच्या याद्या सादर केल्यानंतर लिलावासाठी 292 खेळाडू निश्चित करण्यात आले आहे.61 जागांसाठी या 292 खेळाडूंमध्ये स्पर्धा राहिल.

लिलावाला चेन्नई (Chennai) येथे 18 फेब्रुवारी रोजी दुपारी 3 वा. सुरुवात होणार आहे.

यंदाच्या लिलावात हरभजन सिंग (Harbhajan Singh) व केदार जाधवसह (Kedar Jadhav). 10 खेळाडूंनी आपली ‘बेस प्राईस’ (Base Price) सर्वाधिक 2 कोटी रुपये ठेवली आहे. त्यात ग्लेन मॕक्सवेल, स्टिव्ह स्मिथ, शकिब अल् हसन, मोईन अली, सॕम बिलिंग्ज, लियाम प्लंकेट, जेसन राॕय व मार्क वूड या परदेशी खेळाडूंचाही समावेश आहे.

12 खेळाडूंनी आपली ‘बेसप्राईस’ दीड कोटी रुपये ठेवली आहे. त्यात अॕलेक्स हेल्स, डेव्हिड मालन, अॕलेक्स कॕरी, नेथन कोल्टर नाईल, झे रिचर्डसन, मुजीब उर रहमान, आदिल राशिद, शाॕन मार्श, टॉम करन, डेव्हिड विली, लुईस ग्रेगरी, मोर्ने मोर्केल यांचा समावेश आहे.

एक कोटी रुपयांची बेस प्राईस राखलेल्या खेळाडूंमध्ये भारताच्या हनुमा विहारी व उमेश यादवसह 11 खेळाडू आहेत. त्यात मॕथ्थ्यू वेड, बिली स्टॕनलेक, मार्नस लाबूशेन, मुस्तफिजूर रहमान, शेल्डन काॕट्रेल, आरोन फिंच, मोझेस हेन्रिक्स, जेसन बेहरेनडॉर्फ व एर्विन लुईस यांचा समावेश आहे.

75 लाखांची बेसप्राईस ठेवलेले सर्वच्या सर्व खेळाडू परदेशी आहेत तर 50 लाखाची बेसप्राईस ठेवलेल्या 75 खेळाडूंपैकी 13 भारतीय आहेत.

लिलावासाठी उपलब्ध खेळाडूंमध्ये 164 भारतीय आणि 128 परदेशी खेळाडू आहेत. या 128 खेळाडूंमध्ये नेपाळचा संदीप लामीछान, अमेरिकेचा अली खान, युएईचा कार्तिक मरियप्पन हे कसोटी दर्जा न मिळालेल्या देशांचे खेळाडू आहेत. 176 खेळाडू हे पहिल्यांदाच आयापीएलसाठी खेळण्याच्या तयारीतील (अनकॕप) आहेत. 113 खेळाडू हे आधीच आयपीएल खेळलेले आहेत.

292 खेळाडू लिलावात असले तरी जागा 61 च उपलब्ध आहेत. त्यापैकी 22 जागा परदेशी खेळाडूंच्या आहेत म्हणजे 39 जागाच देशी खेळाडूंसाठी उपलब्ध आहेत.

सद्यस्थितीत रॉयल चॕलेंजर्स बंगलोरच्या संघात सर्वाधिक 11 जागा उपलब्ध असून त्यातील तीन जागा परदेशी खेळाडूंच्या आहेत. किंग्ज इलेव्हन पंजाब व राजस्थान राॕयल्सकडे प्रत्येकी 9 जागा उपलब्ध आहेत. त्यापैकी परदेशी खेळाडूंच्या सर्वाधिक 5 जागा किंग्ज इलेव्हन पंजाबच्या संघात आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER