सैनिकी शाळांमध्ये ओबीसींसाठी २७ टक्के आरक्षण, मोदी सरकराचा मोठा निर्णय

Sainik School

नवी दिल्ली : ओबीसींसाठी (OBC) मोदी सरकारने (Modi Government) अत्यंत महत्वाचा निर्णय घेतला आहे. भारतातल्या सैनिकी शाळांमध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या बर्‍याच विद्यार्थ्यांसाठी आणि त्यांच्या पालकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आता ओबीसींनाही सैनिकी शाळांमध्ये आरक्षण लागू होणार आहे. भारत सरकारचे संरक्षण सचिव अजय कुमार (Ajay Kumar) यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे.

सैनिकी शाळांमध्ये ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना २७ आरक्षणाचा लाभ मिळेल. हे शैक्षणिक सत्र २०२१-२२ पासून लागू केले जात आहे. यासंदर्भात सर्व सैनिकी शाळांच्या मुख्याध्यापकांना आदेशाची परिपत्रके पाठविली गेली आहेत, अशी माहिती अजय कुमार यांनी ट्विट करत दिली आहे.

असा असणार आरक्षण नियम

संरक्षण सचिवांनीही या परिपत्रकाचा फोटो ट्विटरवर शेअर केला आहे. सैनिकी शाळांमधील ६७ टक्के जागा ज्या ठिकाणी शाळा आहे किंवा केंद्रशासित प्रदेश आहेत, तिथल्या विद्यार्थ्यांसाठी राखीव आहेत. उर्वरित ३३ टक्क्यांमध्ये इतर राज्ये किंवा केंद्रशासित प्रदेशांतील विद्यार्थ्यांनी प्रवेश दिला जातो. यासाठी ए आणि बी अशा दोन याद्या तयार केल्या आहेत. आता प्रत्येक यादीतील १५ टक्के जागा अनुसूचित जाती, ७.५ टक्के अनुसूचित जमातीसाठी आणि २७ टक्के जागा ओबीसी प्रवर्गासाठी (नॉन क्रीमी लेयर) राखीव असतील. सध्या देशात एकूण ३३ सैनिकी शाळा सुरू आहेत. त्या संरक्षण मंत्रालयांतर्गत सैनिकी स्कूल सोसायटीद्वारे चालवल्या जातात.

विशेष म्हणजे गेल्या काही दिवसांपूर्वीच १० टक्के आर्थिक आरक्षण केंद्रानं लागू केल्यानंतर ते लष्करात लागू होणार का? याची चर्चा रंगली होती. सध्या सैनिकी शाळांमधल्या ६७ टक्के जागा या ज्या राज्यात शाळा आहे त्या राज्यातल्या किंवा केंद्रशासित प्रदेशातील मुलांसाठी असतात, तर ३३ टक्के जागा या इतर राज्यांमधल्या मुलांसाठी असतात. आता या दोन कॅटेगरीमध्ये सामान्य, एससी-एसटी, ओबीसी असा कोटा असणार आहे. सैनिकी शाळांमधील ओबीसींसाठी २७ टक्के जागा या विद्यमान कोट्याव्यतिरिक्त असतील. शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेशाबाबतचे निकष मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या नियमांनुसार आहेत. या कोट्यासंदर्भात सर्व शाळांच्या प्राध्यापकांकडे १३ ऑक्टोबर रोजी आदेश पाठवण्यात आला आहे, असे अधिकाऱ्यांनी नमूद केले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER