औरंगाबाद : २६ जण कोरोनाबाधित, रुग्णसंख्या १२१२

Coronavirus - Aurangabad

औरंगाबाद : शहरात शुक्रवारी सकाळी २६ कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाल्याने जिल्ह्यात आढळलेल्या कोरोनाबाधितांची एकूण संख्या १२१२ झाली. जयभीम नगर ५, गरम पाणी २, रेहमानिया कॉलनी २, कवरपल्ली, राजा बाजार १, सुराणा नगर १, मिल कॉर्नर १, न्याय नगर ४, भवानी नगर, जुना मोंढा २, रहीम नगर, जसवंतपुरा १, पुंडलिक नगर, गल्ली नं. १० येथील १, सातारा परिसर १, जवाहर कॉलनी १, टाइम्स कॉलनी, कटकट गेट येथील ३, एन २ सिडको १ असे १६ पुरूष आणि १० महिला करोना बाधीत आढळून आल्याने जिल्हा प्रशासनाने कळवले. बुधवारी रात्रीपर्यंत १११९ कोरोनाबाधितांची संख्या असताना गुरुवारी यामध्ये ६७ रुग्णांची भर पडल्याने जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा आकडा ११८६ वर गेला होता. त्यात आज शुक्रवारी २६ रुग्णांची भर पडल्याने कोरोनाबाधितांची संख्या १२१२ झाली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला