
मुंबई : ‘२६ नोव्हेंबर हा दिवस आपण कधीही विसरू शकत नाही. त्या दुर्दैवी घटनेला १२ वर्षे झाली. यापुढेही कित्येक वर्षे उलटतील; पण काळजावर झालेली ही जखम कधीही भरून येणार नाही. ’ अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आज भावना व्यक्त केल्या.
मुख्यमंत्रांच्या हस्ते आज महाराष्ट्र पोलीस महासंचालनालयातील हुतात्मा दालनाचे उद्घाटन व ‘अतुल्य हिंमत’ या कॉफी टेबल बुकचे प्रकाशन झाले. गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh), पर्यावरण व राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे उपस्थित होते. २६ नोव्हेंबरच्या हल्ल्यात शहीद झालेल्या पोलिसांना मुख्यमंत्र्यांनी श्रद्धांजली अर्पण केली. त्या रात्री विजय साळसकर यांच्यासोबत झालेल्या संभाषणाची आठवण मुख्यमंत्र्यांनी सांगितली.
‘त्या दिवशी मी मुंबईबाहेर होतो. मुंबईतील घटना कळताच प्रथम विजय साळसकरांना फोन लावला. घटनेची माहिती देताना साळसकरांनी सांगितले की, मी आता घरी असून लगेचच घटनास्थळी जातो आहे. काही वेळाने पुन्हा त्यांना फोन लावला, पण तो फोन उचलला गेलाच नाही … आणि नंतर ती दुर्दैवी घटना घडली. १२ वर्षे झाली, यापुढेही कित्येक वर्षे उलटतील; पण काळजावर झालेली ही जखम कधीही भरून येणार नाही.
महाराष्ट्र पोलिसांच्या कामाचे मुख्यमंत्र्यांनी कौतुक केले. ‘सण-उत्सव असो वा सभा असो, गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आमचे पोलीस २४ तास कर्तव्य बजावत असतात. स्वत:च्या कुटुंबातील सुखदु:ख बाजूला ठेवून जनतेच्या सुखदु:खात सहभागी होतात. अशा आमच्या पोलिसांचा मला अभिमान आहे.
’ असं मुख्यमंत्री म्हणाले. ‘पोलीस विभागाच्या सक्षमीकरणासाठी राज्य सरकार सदैव कटिबद्ध असून जे काही करणं शक्य आहे, ते सर्व करणारच. ’ असं वचन मुख्यमंत्र्यांनी दिलं. ‘पोलीस हा महत्त्वाचा घटक आहे. तो सुदृढ राहिलाच पाहिजे. त्याला सुदृढ ठेवणं हे आमचं कर्तव्य आहे. यापुढे मुंबई किंवा महाराष्ट्रावर हल्लाच काय, अतिरेकी मुंबईचे नावही घेऊ शकणार नाहीत, त्यांना धडकी भरेल, असं पोलीस दलाचं सक्षमीकरण करू.’ अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली.
मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या उपस्थितीत आज मुंबई येथील पोलिस महासंचालक कार्यालय येथे हुतात्मा दालनाचे उद्घाटन तसेच “अतुल्य हिंमत” या कॉफी टेबल बूकचे प्रकाशन करण्यात आले. pic.twitter.com/LWQjkmL3OH
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) November 26, 2020
CMO Maharashtra – live via https://t.co/wyTAwK3xJq https://t.co/6qag1e5zhS
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) November 26, 2020
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला