समृद्धी महामार्गाच्या भूसंपादनासाठी एमआयडीसीकडून २५० कोटींचा धनादेश

Smruddhi Mahamarg

मुंबई :- समृद्धी महामार्गाच्या कामाला गती मिळण्यासाठी व भूसंपादन करण्यासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या वतीने राज्य रस्ते विकास महामंडळाला आज सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत २५० कोटी रुपयांचा धनादेश सुपूर्द करण्यात आला. उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी हा धनादेश सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सुपूर्द केला.

ही बातमी पण वाचा : परदेशातील उच्च शिक्षणसाठी शिष्यवृत्ती योजना; ऑनलाईन अर्ज करण्यासाठी ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ

नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग प्रकल्पासाठी विविध संस्थांकडून भूसंपादनासाठी दुय्यम कर्ज स्वरुपाची रक्कम उपलब्ध करून देण्यात येत आहे. एमआयडीसीने यापूर्वी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाला एक हजार कोटी रुपये उपलब्ध करून दिले आहेत. या कामासाठी अधिक गती प्राप्त व्हावी यासाठी आज पुन्हा नव्याने अडीचशे कोटी रुपयांचा निधी दुय्यम कर्ज स्वरुपात उपलब्ध करून देण्यात आला.