दिल्लीत सर गंगाराम रुग्णालयात ऑक्सिजनअभावी २५ रुग्ण दगावले

patients died due to lack of oxygen - Maharastra Today

नवी दिल्ली :- देशातील कोरोना महामारी अत्यंत भयावह होत चालली आहे. दिवसेंदिवस रुग्णांचा आकडा दुपटीने वाढत आहे. त्यातच आता राज्यात ऑक्सिजनचा तुटवडा मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. ऑक्सिजनअभावी अनेक रुग्णांचा जीव धोक्यात आला आहे. तर काही ठिकाणी ऑक्सिजन न मिळाल्यास रुग्ण दगावले. अशातच आता दिल्लीतील सर गंगाराम रुग्णालयात २५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ऑक्सिजनच्या अभावी या रुग्णांना आपला जीव गमवावा लागला आहे. अजूनही या रुग्णालयात ६० रुग्णांचा जीव धोक्यात असल्याचे सांगण्यात येत आहे.

“ऑक्सिजनचा पुरवठा अजून केवळ दोनच तास चालेल. व्हेन्टिलेटर आणि बीआयपीएपी मशीन प्रभावीपणे काम करत नाहीत. त्यामुळे गंभीर स्थितीत असलेल्या ६० रुग्णांचा जीव धोक्यात आला आहे.” असे सर गंगाराम रुग्णालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

दिल्लीत दिवसेंदिवस रुग्णसंख्या वाढत आहे. दिल्लीतील आरोग्य यंत्रणेवर ताण आला आहे. तसेच बेड्स आणि ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत असल्याचे दिसून येत आहे. काल दिल्लीतील GTB रुग्णालयात एक प्रसंग निर्माण होऊन ऑक्सिजनच्या पुरवठ्यात तुटवडा निर्माण झाला आणि त्यामुळे ५०० रुग्णांचा जीव धोक्यात आला होता. पण या ठिकाणी वेळेत ऑक्सिजनचा टँकर पोहचला आणि सर्व रुग्णांचा जीव वाचला. ही घटना ताजी असतानाच आज सर गंगाराम रुग्णालयात दुर्दैवी घटना घडली आहे.

गेल्या २४ तासांत दिल्लीत २६ हजार १६९ कोरोनाच्या नव्या रुग्णांची भर पडली आहे, तर ३०६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. गेल्या १० दिवसांत दिल्लीत १ हजार ७५० रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

ही बातमी पण वाचा : शरद पवार ऍक्शन मोडवर, साखर कारखान्यांना ऑक्सिजन निर्मितीचे आदेश

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button