कोरोना : भारतात २५ लाख रुग्ण

- सुरुवातीचे एक लाख ११० दिवसांत, नंतरचे २४ लाख ८८ दिवसांत

25 lakh corona patients in India

दिल्ली : कोरोनाच्या रुग्णांची (corona patients) संख्या भारतात शुक्रवारी २५ लाखांच्या पुढे गेली. देशात कोरोनाचा पहिला रुग्ण ३० जानेवारीला आढळला होता. त्यानंतर ११० दिवसांनी, १० मे रोजी कोरोनाच्या रुग्णांची संख्या एक लाख झाली.

मात्र त्यानंतर रुग्णांची संख्या वेगाने वाढली आणि ८८ दिवसांत रुग्णांचा आकडा २५ लाखांच्या पुढे गेला आहे. सध्या देशात कोरोनाचे २५,१२,२४५ रुग्ण आहेत. ४९ हजार रुग्णांचा मृत्यू झाला आहे. शुक्रवारी ५२,६३० नवे रुग्ण आढळलेत. ८६० पेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू झाला. १७,३९,२५० रुग्ण बरे झाले आहेत. ६,६६,५०३ सक्रिय (ऍक्टिव्ह) रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

लव अग्रवाल यांना कोरोना
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनाही कोरोना झाला आहे. लव अग्रवाल रोज देशातील कोरोना परिस्थितीची माहिती देत होते. लव आरोग्य मंत्रालयात ग्लोबल हेल्थ, मेंटल हेल्थ, टेक्नोलॉजी, पब्लिक पॉलिसीचे काम पाहतात.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER