मुंबई विमानतळ वरून 25 किलो चंदनाचा साठा जप्त

सुदान नागरिकांना अटक, सीआयएसएफची कारवाई

25 kg of sandalwood seized from Mumbai airport.jpg

मुंबई : मुंबई आंतराष्ट्रीय विमानतलावरुन सुदानच्या दुकली कडून २५ किलो चंदनाचा साठा जप्त करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. गेल्या महिनाभरात सुदानचे नागरिक चंदन तस्करित डोके वर काढत असल्याचे कारवाईतून समोर येत असल्याचे अधिकाऱ्यांनी नमूद केले.

मंगळवारी तपासणी दरम्यान सुदानच्या दोन नागरिकांना गेट क्रमांक 6 येथे अडविन्यात आले. त्यांच्या बगेतून २५ किलो चंदनाचा साठा मिळून आला. त्यानुसार दोघांना अटक करत अधिक तपास सुरु आहे.

महिनाभरात १२९ किलो चंदन जप्त…
गेल्या महिनाभरात सुदानचे नागरिक चंदन तस्करित डोके वर काढत असल्याचे कारवाईतून समोर येत असल्याचे अधिकाऱ्यांनी नमूद केले. आतापर्यंत त्यांनी केलेल्या चार कारवाईत १५ लाख किंमतीचे १२९ किलो चंदन जप्त केले आहे. त्यात पाच जणांना अटक करण्यात आली आहे.