२४२ कोटी रुपयांचा निधी मंजूर; १०० कोटींची अतिरिक्त मागणी

Dhanajay Munde

बीड : जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या अध्यक्षतेत जिल्हा नियोजन समितीची बैठक झाली. या समितीकडून नवीन आर्थिक वर्षासाठी २४२ कोटी ८३ लाखांच्या प्रारूप आराखड्यास मंजुरी देण्यात आली. तसेच १०० कोटींची अतिरिक्त मागणी विभागीय आयुक्तांकडे केली आहे. ९ फेब्रुवारीला प्रारूप आराखड्यावर औरंगाबाद येथे विभागीय आयुक्तांकडे बैठक होणार आहे. बैठकीत पालकमंत्री म्हणाले की, मागील वर्षी २०१९-२० मध्ये २४५ कोटी २९ लाखांचा खर्च झाला होता.

या वेळी वार्षिक योजनेचा निधी वेळेत खर्च करण्यासाठी सहा महिने मुदत वाढवून द्यावी, असा ठराव बैठकीत घेण्यात आला आहे. तसेच यासंदर्भात मंत्रालयीन स्तरावरून परवानगी घेण्यासाठी प्रयत्न करणार आहे, असे मुंडे यांनी सांगितले. ऊसतोड कामगारांच्या मुलामुलींसाठी वसतिगृहे सुरू करण्यास राज्य शासनाने मान्यता दिली आहे. जिल्ह्यातील प्रत्येक मतदारसंघात एक वसतिगृह उभारण्यात येणार आहे, असे मुंडे यांनी सांगितले. बैठकीत गैरहजर असलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची सूचना पालकमंत्र्यांनी जिल्हाधिकारी रवींद्र जगताप (Ravindra Jagtap) यांना दिली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER