राज्यात २४१ लाख में. टन उसाचे गाळप तर २१५ लाख क्विटल साखर उत्पादन

Sugar & Sugarcane

पुणे : राज्यातील १६६ कारखान्यांनी मिळून गेल्या महिन्याभरात १४२ लाख ३३ हजार टन उसाचे (Sugarcane) गाळप केले आहे. आतापर्यंत २१५ लाख क्विंटल साखरेचे (Sugar) उत्पन्न झाले असून सरासरी उतारा ८.९१ टक्के आहे. कोल्हापूर (Kolhapur) आणि सांगली (Sangli) जिल्ह्यातील ३६ कारखान्यांनी ५३ लाख १२ हजार मेट्रीक टन उसाचे गाळप करुन ५४ लाख क्विंटल साखर उत्पादीत केले. राज्यात कोल्हापूर विभागात उताऱ्यामध्य अव्वल असून १०.३४ टक्के उतारा मिळाला.

परतीचा पाऊस, कोरोना (Corona) महामारीचे संकट, ऊसतोड मजुरांची कमतरता, साखरेचे घसरलेले दर, एकरकमी एफआरपी देण्यासाठीची कसरत आदी संकटांचा सामान करत यंदाचा गळीत हंगाम सुरू झाला. सरासरी पेक्षा २० टक्के उसाचे जादा उत्पन्न होईल असा अंदाज आहे. राज्यातील आठ विभागांत १६६ साखर कारखान्यांची सहा लाख ४२ हजार मे टन उस गाळपाची क्षमता आहे. यंदाचा हंगाम मार्च अखेर चालेल असा अंदाज आहे.

पुणे विभागात ५५ लाख १९ हजार, सोलापूर विभागात ५३ लाख ५७ हजार में. टन उसाचे गाळप झाले आहे, तर कोल्हापूर विभागात ५३ लाख १२ हजार में, टन गाळप झाले आहे. अहमदनगर ३९लाख टन,औरंगाबाद २२ लाखटन, नांदेड १६ लाख टन, अमरावती विभागातील दोन कारखान्यांनी दीड लाख टन उसाचे गाळप केले आहे. ऊस गाळपात राज्यात पुणे विभाग आघाडीवर आहे; मात्र सरासरी साखर उताऱ्यात कोल्हापूर १०.३४ टक्के उताच्यासह आधाडीवर आहे. सर्वांत कमी साखर उतारा औरंगाबाद विभागाचा ७.६ टक्के इतका आहे. नागपुर विभागात एकाही साखर कारखान्याचा गाळप हंगाम सुरू झालेला नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER