मुंबईतील २४ वर्षीय तरुणी पहिली महिला ‘बेस्ट’ बस चालक

24 years old woman BEST bus driver

मुंबई :- मुंबईतील बेस्टने आता बसचे स्टेअरिंग थेट महिलांच्या हाती देण्याचा आणखी एक नवीन निर्णय घेतला असून प्रतिक्षा दास ही महिला बेस्टची पहिली महिला चालक होणार आहे. नुकतेच तिने प्रशिक्षणही घेण्यास सुरुवात केली आहे.

मालाडमधील ठाकूर महाविद्यालयातून मेकॅनिकल इंजिनियरिंगची पदवी घेतलेली 24 वर्षीय प्रतिक्षा लवकरच बेस्टच्या सेवेत रुजू होणार आहे. मला अवजड वाहनांचे प्रचंड वेड असून बेस्टची बस चालविण्याची माझी सहा वर्षांपासून इच्छा होती असे ती म्हणाली, बेस्टमध्ये प्रशिक्षण सुरु करण्याच्या आधीपासूनच मला अवजड वाहने, बाईक्स आणि कारचे प्रचंड वेड आहे. बाईक तर मी आठव्या वर्गातच शिकल्याचे ती म्हणाली. आता मी बाईक्स, मोठ्या चारचाकी गाड्या आणि अगदी ट्रकही सहज चालवू शकते. आणि मला त्याचा चालवताना खूप छान वाटते,’ असे प्रतीक्षा म्हणाली.

ही बातमी पण वाचा : हालेप विम्बल्डनची नवी राणी

प्रशिक्षणासंदर्भात बोलताना ती म्हणाली, माझ्या सोबतच्या पुरुष प्रशिक्षणार्थींना तसेच शिकवणाऱ्यांना माझ्या क्षमतेवर शंका होती. ‘या मुलीला बेस्टची बस नाही चालवता येणार,’ ‘हिची उंची कमी आहे ही कशी बस चालवणार?’, असे अनेक टोमणे आपण या प्रशिक्षणादरम्यान ऐकल्याचे प्रतीक्षा सांगते. मात्र अनेकजण एका मुलीला बेस्टची बस चालवताना बघून थांबून मागे बघायचे. मात्र मी त्यांच्या नजरांकडे दुर्लक्ष करत बस चालवत रहायचे अशी प्रशिक्षणाच्या सुरुवातीच्या दिवसांच्या आठवणी तिने सांगितल्या. ती गोरेगाव बस डेपोमध्ये प्रतीक्षा सध्या प्रशिक्षण घेत आहे.