
कोल्हापूर : दुसऱ्या टप्प्यात जिल्ह्यात १९ ठिकाणी कोव्हीड काळजी केंद्रातून २३३८ खाटांची सोय करण्यात येणार आहे. या केंद्रांचे कामकाज अधिक प्रभावीपणे होण्यासाठी महानगरपालिका क्षेत्रासाठी आरोग्य आधिकारी डॉ दिलीप पाटील, नगरपालिका क्षेत्रासाठी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ बी सी केम्पीपाटील आणि ग्रामीण भागासाठी आरोग्य अधिकारी डॉ योगेश साळे यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक योजना म्हणून दुसऱ्या टप्प्यातील कोव्हीड काळजी केंद्रासाठी पुढील संस्थांची निवड करण्यात आली आहे.
नव्याने स्थापन होणारी कोव्हीड काळजी केंद्रे आणि खाटांची क्षमता
- करवीर व कोल्हापूर शहर – शिवाजी विद्यापीठ होस्टेल क्र १ आणि २ प्रत्येकी १५० खाट, शिवाजी विद्यापीठ होस्टेल क्र ३ – २०० खाट,
- तंत्रशास्त्र विभाग- ३०० खाट, आयसोलेशन रुग्णालय व आरोग्य कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्र, अंडी उबवणी केंद्र, कृषी महाविद्यालय होस्टेल (पदवी आणि पदव्युत्तर), राजर्षी शाहू पब्लिक स्कूल, कुरुकली प्रत्येकी १०० खाट.
- कागल- कोगनोळी टोल नाका कोव्हीड काळजी केंद्र गोदाम- १५० खाट
- भुदरगड- संत बाळूमामा मंदिर रुग्णालय- १५० खाट
- शिरोळ- डॉ जे जे मगदूम वैद्यकीय महाविद्यालय, आगर- ६०, डॉ एम सी मोदी होमिओपथी रुग्णालय, जयसिंगपूर- ९०.
- हातकणंगले- संजय घोडावत होस्टेल, अतिग्रे, एच ५, एच ६ आणि एच ७ अनुक्रमे ९०, १०५ आणि १०० खाट,
- पन्हाळा- संजीवन महाविद्यालय- १२८, महात्मा गांधी रुग्णालय, वारणा- १५० आणि डॉ पाटील आयुर्वेदीक रुग्णालय, कोडोली- ७५.
- शाहुवाडी- प्राथमिक आरोग्य केंद्र शित्तूर- ४०
या संस्थांची दुसऱ्या टप्प्यात कोव्हीड काळजी केंद्र म्हणून निवड करण्यात आली आहे. या केंद्राचे कामकाज तातडीने सुरु करण्याविषयी सर्व तालुकास्तरीय अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. केंद्रातील कामकाजासाठी तांत्रिक मार्गदर्शन व सहाय्य करण्यासाठी नोडल अधिकाऱ्यांचीही नियुक्ती करण्यात आली आहे .
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला