स्मार्ट ठाण्यासाठी धावले 23 हजार स्पर्धक

30th Thane Mayor varsha Marathon
  • 30 वी ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन दिमाखात संपन्न
  • पुरूष गटात करणसिंग घिसाराम तर महिला गटात आरती पाटील अजिंक्य

ठाणे : राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय खेळाडूंची उपस्थिती आणि पावसाच्या साक्षीने जवळपास 23 हजारांपेक्षा जास्त स्पर्धक ‘ स्मार्ट सिटी स्मार्ट मॅरेथॉन ‘ नारा देत 30 व्या महापौर वर्षा मॅरेथॉन स्पर्धेत उत्साहात धावले. अतिशय जल्लोषात संपन्न झालेल्या या स्पर्धेत पुरुष व महिला या दोन्ही गटात पुणेकरांनी बाजी मारली. पुरुष गटात करणसिंग घिसाराम याने 1 तास 10 मिनीटे आणि 3 सेकंदामध्ये 21 कि.मी. अंतर पूर्ण करुन अजिंक्यपद पटकावले तर 21 कि.मी.अंतराच्या महिला गटात आरती पाटील हिने 1 तास 27 मिनीटे आणि 47 सेकंदामध्ये स्पर्धेचे अंतर पूर्ण करुन अजिंक्यपद पटकावले. महापौर सौ.मिनाक्षी राजेंद्र शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली खासदार राजन विचारे, आमदार सुभाष् भोईर, प्रताप सरनाईक तसेच मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात आले. या दोन्ही विजेत्यांना प्रत्येकी रोख रूपये 75 हजार तसेच मानचिन्ह देवून गौरविण्यात आले. गतवर्षीपेक्षा यंदा या स्पर्धेत अधिक स्पधर्धकांनी आपला सहभ्ाग नोंदविला. गेल्यावर्षी 21 हजार 700 तर या वर्षी 22 हजार 760 स्पर्धक सहभागी झाले होते.

सकाळी 6.30 वा. या स्पर्धेला सुरूवात झाली. 21 किमी स्पर्धेला महापौर मिनाक्षी शिंदे यांच्‍या हस्ते झेंडा दाखवून या स्पर्धेला प्रारंभ करण्‍यात आला. त्‍यानंतर टप्‍प्‍या टप्‍प्‍याने सुरू झालेल्‍या विविध गटातील स्पर्धाना राज्‍याचे सार्व. बांधकाम (उपक्रम), सार्व. आरोग्य मंत्री तथा ठाणे जिल्हयाचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी झेंडा दाखवित स्पर्धकांना शुभेच्‍्छा दिल्या.

या स्पर्धेच्या पुरुष गटात धनवत प्रल्हाद रामसिंग याने तर महिला गटात वर्षा प्राजक्ता पाटील हिने स्पर्धेचे उपविजेतेपद पटकावले यावेळी खासदार राजन विचारे, डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार सुभाष् भोईर, रविंद्र फाटक, उपमहापौर रमाकांत मढ़वी, स्थायी समिती सभापती राम रेपाळे, सभागृह नेते नरेश म्हस्के, विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील, अतिरिक्त आयुक्त(2) समीर उन्हाळे, नगरसेवक तथा शिवसेना गटनेते दिलीप बारटक्के, क्रीडा व सांस्कृतिक समिती सभापती अमर पाटील, शिक्षण समिती सभापती विकास रेपाळे, महिला बालकल्याण समिती सभापती सौ.जयश्री डेव्हिड, गलिच्छ वस्ती निर्मुलन समिती सभापती मंगल कळंबे, वर्तकनगर प्रभाग समिती अध्यक्ष श्री नरेंद्र सुरकर,वागळे प्रभाग समिती अध्‍यक्षा शिल्पा वाघ, माजिवडा मानपाडा प्रभाग समिती अध्यक्षा पद्मा भगत, नगरसेवक दशरथ पालांडे, भूषण भोईर, उमेश पाटील, सुधीर कोकाटे, नगरसेविका सौ. नंदिनी विचारे, सौ. राधिका फाटक, सौ. विमल भोईर,सौ.रुचिता मोरे, सौ.निर्मला कणसे, सौ.सुखदा मोरे, रुचिता मोरे, सौ, निर्मला कणसे, सौ. पल्‍लवी कदम, सौ.दर्शना म्हात्रे, सौ.अंकिता पाटील, सौ.प्रभा बोरीटकर, सौ.पुजा करसुळे, सौ. मिनल संख्‍ये, सौ. परिषा सरनाईक, सौ.कांचन चंदरकर, अ‍ॅड. सौ.अनिता गौरी, प्रियांका पाटील, माजी महापौर सौ.स्मिता इंदुलकर तसेच अतिरिक्त आयुक्त (2) श्री. समीर उन्‍हाळे, उप आयुक्त श्री. संदीप माळवी, श्री. अशोक बुरपल्ले, ओमप्रकाश दिवटे, सहाय्यक आयुक्त शंकर पाटोळे, नगर अभियंता रवींद्र खडताळे, मोहन कलाल, शिक्षणाधिकारी राजेश कंक्राळ, क्रीडा अधिकारी मीनल पालांडे, जिल्हा अ‍ॅथलेटिक्स असोसिएशनचे सचिव श्री. अशोक अहेर, श्री. सचिन मराठे, श्री. प्रमोद कुलकर्णी आदी सदस्य उपस्थित होते. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. राजेंद्र पाटणकर व श्री. मोझेस यांनी केले.

• त्रिदल फाऊंडेशनचाही सहभाग

मानसिक आरोग्य क्षेत्रात गेली तीन दशके अविरत काम करणा-या ठाणे येथील इनिस्ट्टयूट फॉर सायकॉलॉजीकल हेल्‍्थृ या संस्थेच्‍या त्रिदल या प्रकल्‍पातर्फे 40 जणांचा गट या स्पर्धेत सहभागी झाले होते.

• वागळे येथील मिलेनियम टोयाटो कंपनीच्‍या माध्‍यमातून या स्पर्धेकरिता पायलट वाहनांचा पुरवठा करुन सहकार्य करीत असल्‍याबद्दल कंपनीचे व्यवस्थापक सुरेश नायर व शशी अंबाडे यांनाही यावेळी सन्मानित करण्‍्यात आले.

• ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन 2019 हे बोधचिन्ह असलेल्या टपाल पाकिटांचे अनावरण यावेळी करण्‍्यात आले.

किन्नर समाज व सलाम बालक ट्रस्टचाही सहभाग

यंदा या स्पर्धेत किन्नर समाजही सहभागी झाले होते. आपणही याच समाजाचा एक घटक आहोत हे या माध्‍्यमातून त्यांनी दाखवून दिले. तसेच समाजात एकट्या राहणा-या उपेक्षीत मुलांना 24 तास मदतीचा हात देणारी सलाम बालक ट्रस्‍्टचे पदाधिकारी मुलांसह यात सहभागी झाले होते.

ग्रीन एन्‍व्‍हायरमेंट फाऊंडेशन

पर्यावरण क्षेत्रात काम करणा-या ग्रीन एन्व्हायरमेंट फाऊंडेशनचे पदाधिकारी यात सहभागी झाले होते. यावेळी त्‍यांनी सीडबॉम्बचे वाटप प्रातिनिधीक स्वरुपात वाटप केले. ठाणे शहरात विविध ठिकाणी असे 40 हजार सीडबॉम्ब्‍ टाकण्‍यात येणार आहेत.

रन टू गेट बॅक टू लाईफ

• ज्‍युपिटर रुग्णालय हे या स्पर्धेत हेल्‍थ् केअर पार्टनर म्‍हणून सहभागी झाले होते. रन टू गेट बॅक टू लाईफ या गटात ज्यूपिटर हॉस्पिटलमधून अर्धांगवायू या आजारावर उपचार घेवून पूर्णतः बरे झालेले रुग्ण अत्यंत उत्साहात सहभागी झाले होते.

आंतरराष्‍ट्रीय खेळाडूंचाही सन्‍मान

• स्वित्झर्झलंड येथे झालेल्‍्या श्री चिन्मॉय मॅरेथॉन स्‍्वीम या आंतरराष्‍ट्रीय स्पर्धेत शुभम पवार याने 26 की.मीचे अंतर 8 तास 5 मिनिटे 34 सेंकंदात पूर्ण केले. आशिया ख्ंडातून सहभागी झालेला हा एकमेव जलतरणपटू आहे.

• 27 जुलै 2019 रोजी द. कोरिया येथे झालेल्या जिम्नॅस्टिक स्पर्धेत सहभाग घेवून 3 ते 6 ऑकटोबर 2019 या कालावधीत मॉट्रियल कॅनडा येथे होणा-या वलर्ल्ड चॅम्पीयनशीप स्पर्धेत पोल स्‍्पोर्टस या खेळात ठाणेकर ओवी प्रभू भारताचे प्रतिनिधीत्व करणार आहे.

• प्रणव देसाई या आंतरराष्‍ट्रीय खेळाडूने स्वित्झलंड येथे पॅराऑलिम्पक अ‍ॅथलेटिक स्‍्पर्धेत सहभाग घेवून उत्कृष्‍ट कामगिरी केली आहे.

• सांगली येथील पूरग्रंस्तांच्‍या सोबत जीवाची बाजी लावून थेट पाण्‍्यात उतरून तेथील भीषण् परिस्थितीचे वास्तव दर्शकांपर्यत पोहचविणारे एबीपी माझाचे प्रतिनिधी अक्षय भाटकर यांचाही विषेश्‍ गौरव करण्‍्यात आला.

या स्पर्धेचा सविस्तर निकाल खालीलप्रमाणे

पुरुष – 21 किमी (राज्यस्तरीय)

करणसिंग घिसाराम (प्रथम), धनवत प्रल्हाद रामसिंग (दुसरा), ज्ञानेश्‍्वर मोरघा (तृतीय), मंजित सिंग (चतुर्थ), प्रल्हाद सिंग (पाचवा), विजय मोरघा (सहावा), दिनकर महाले (सातवा), राजू चौधरी (आठवा), अक्षय जितेकर (नववा), अनिल कोरवी (दहावा)

महिला- 21 किमी (राज्यस्तरीय)

आरती पाटील (प्रथम), प्राजक्ता गोडबोले (व्दितीय), अक्षया जडीयार (तृतीय), नयन किर्दक (चतुर्थ), तेजस्विनी नरेंदर (पाचवा),

18 वर्षावरील पुरुष- 10 किमी(राज्यस्तरीय)

किरण म्हात्रे (प्रथम), पराजी गायकवाड (व्दितीय), शेषनाथ चौहान (तृतीय), अमित माळी (चतुर्थ), छगन बोंबले (पाचवा), भगिनाथ गायकवाड (सहावा), सोमनाथ पवार (सातवा), दादासो वयभट (आठवा), शुभम राठोड (नववा), अविनाश पवार (दहावा)

16 वर्षावरील महिला – 10 किमी (राज्यस्तरीय)

कोमल चंद्रकांत जगदाळे (प्रथम), निकीता विजय राऊत (व्दितीय), प्राजक्ता शिंदे, (तृतीय), निकिता जयदेव नागपूरे (चतुर्थ), पुजा ओडोळे (पाचवा), ऋतुजा जयवंत सकपाळ (सहावा), प्रतिक्षा प्रदीप कुळये (सातवा), कविता संजय भोईर (आठवा), प्रियांका दशरथ पाईकराव (नववा), स्वप्नाली भास्कर बेनकर (दहावा)

18 वर्षाखालील पुरुष -10 किमी (राज्यस्तरीय)

किशोर काशिराम जाधव (प्रथम), आकाश् राजेश् परदेशी (व्दितीय), संदीप रामचंद्र पाल (तृतीय), संजय मारोती झाकणे (चतुर्थ), रोहिदास विठ्ठल मोरघा (पाचवा), जयप्रकाश यादव (सहावा), अंकीत भास्कर भोरे (सातवा), गोविंद राजभर (आठवा), शुभम विकास मढवी (नववा), सागर अशोक म्हसकर (दहावा)

15 वर्षाखालील मुले – 5 किमी

जिलानी अन्सारी (प्रथम) , विकास रामविलास राजभर (व्दितीय), शशिकांत प्रदीप चौहान (तृतीय), अनिल हिरामन वैजल (चतुर्थ), अमोल कृष्‍्णा भोये (पाचवा), मोईन शब्बीर शेख (सहावा), तुषार सुरेश् कोटाल (सातवा), ओमप्रकाश् पाल(आठवा), अनुप अरुण यादव (नववा), रोहित रमेश ननवर (दहावा)

15 वर्षाखालील मुली -5 किमी

निकिता अतुल मरले (प्रथम), परिना खिलारी (व्दितीय), काजल बाबू शेख (तृतीय), मीना दत्तात्रय कांबळे (चतुर्थ), श्रावणी अनिल गुरव (पाचवा), साक्षी गणपत जाधव (सहावा), सिध्दी रमेश वेजरे (सातवा), वर्षा जवाहलाल प्रजापती (आठवा), प्रतिभा चंद्रकांत खुताडे (नववा), ज्‍योती दिलीप धुम (दहावा)

12 वर्षाखालील मुले -3 किमी

शुभम अशिलेश श्रीवास्तव (प्रथम), यश संजय सुर्वे (व्दितीय), आर्यन नानासाहेब कदम (तृतीय), चिराग शेट्टी (चतुर्थ), गणेश सुरेश यादव (पाचवा), आशिष कांताप्रसाद गौतम (सहावा), शिवम यादव (सातवा), सुमित विशाल गौतम (आठवा), अर्नव जाधव (नववा), हर्ष माहिंदत (दहावा)

12 वर्षाखालील मुली -3 किमी

गायत्री अजित शिंदे (प्रथम), तन्वी विजय माने (व्दितीय), साधना यादव (तृतीय), राधा यादव (चतुर्थ), रचना संजय सिंह (पाचवा), तन्वी पूनाराम चौधरी (सहावा), निशा युवराज हलगरे (सातवा), कृतिका मंजित चंदेल (आठवा), भावना बेलासे (नववा), कनन कल्‍पेश देसाई (दहावा)

60 वर्षावरील पुरुष (ज्येष्ठ नागरिक)-

हरिश्चंद्र रामचंद्र पाटील (प्रथम), किसन गणपत अरबूज (व्दितीय), चंद्रकांत गणपत गायकवाड (तृतीय), दिपक रघुनाथ निकम (चतुर्थ), लक्ष्‍्मण् नागोजी गावडे (पाचवा)
,
60 वर्षावरील महिला (ज्येष्ठ नागरिक)-

पद्मजा यशवंत चव्हाण (प्रथम), मीना शिरिष दोशी (व्दितीय), रेखा विलास ताम्हणेकर (तृतीय), वृषाली विश्वास बांदल (चतुर्थ), सिंदुरा सुरेश येवले (पाचवा),

रन फॉर स्मार्ट ठाणे (2 किमी )

अनिल यादव (प्रथम), मनोज नवोर (व्दितीय), दत्ता देवकर (तृतीय), महादेव गायवत (चतुर्थ), चेतन म्हात्रे (पाचवा).