राज्यात २४ तासात २३ हजार ४४६ नवे करोना रुग्ण

Maharashtra Coronavirus

मुंबई : राज्यात कोरोना (Corona) रुग्णांची आकडेवारी दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. मागील २४ तासांमध्ये २३ हजार ४४६ नवे करोना रुग्ण आढळले आहेत. तर मागील २४ तासांमध्ये ४४८ मृत्यूंची नोंद झाली आहे. आत्तापर्यंत महाराष्ट्रात करोनाची बाधा होऊन २८ हजार २८२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रातील करोना रुग्णांची एकूण संख्या ९ लाख ९० हजार ७९५ इतकी झाली आहे. सध्याच्या घडीला महाराष्ट्रात (Maharashtra) २ लाख ६१ हजार ४३२ उपचार सुरु असलेले केसेस आहेत. मागील २४ तासांमध्ये १४ हजार २५३ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आलाय. आत्तापर्यंत महाराष्ट्रात एकूण ७ लाख ७१५ करोना रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.

राज्यात सध्या २ लाख ६१ हजार ४३२ उपचार सुरु असलेले रुग्ण आहेत. आज राज्यात २३ हजार ४४६ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची संख्या ९ लाख ९० हजार ७९५ झाली आहे.

महाराष्ट्रातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट ७०.७२ टक्के इतके झाले आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ४९ लाख ७४ हजार ५५८ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ९ लाख ९० हजार ७९५ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १६ लाख ३० हजार ७०१ व्यक्ती होम क्वारंटाइन आहे तर ३८ हजार २२० व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइन आहेत.

Check PDF

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER