
मुंबई : अमरावती (Amravati) नंतर आता अकोला (Akola) जिल्ह्यातल्या काही भागात जिल्हाधिकाऱ्यांनी लॉकडाऊनची (Lockdown) घोषणा केली आहे. 23 फेब्रुवारी ते 1 मार्च असा आठवडाभराचा लॉकडाऊन करण्यात आल्याची घोषणा जिल्हाधिकाऱ्यांनी केली आहे. विदर्भातील जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग अधिकच वाढत चालला आहे. तर काही ठिकाणी परिस्थिती राज्याच्या तुलनेत खूपच गंभीर होत चालली आहे. त्यापार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.
संपूर्ण अकोला जिल्ह्यात लॉकडाऊन घोषीत करण्यात आलेला नाही तर अकोला शहर, मुर्तीजापूर शहर आणि अकोट शहर अशा तीन ठिकाणी हा लॉकडाऊन असेल. सकाळी 8 ते दुपारी 3 वाजेपर्यंत जीवनाश्यक वस्तुंची दुकानं सुरु रहातील. इतर सगळी दुकानं बंद रहातील. जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी हे आदेश काढले आहेत. 23 तारखेपासून लॉकडाऊन असल्यामुळे जनतेकडं जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी आणखी दोन दिवस असतील. त्या काळात त्यांना हवं त्या वस्तू खरेदी करता येतील. मुख्यमंत्र्यांनीच अचानक लॉकडाऊन न करण्याची घोषणा केली आहे. त्यापार्श्वभूमीवरच लॉकडाऊनच्या आधी दोन दिवसांचा दिलासा देण्यात आला आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला