२२५१ कोटी : ‘सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया’ सर्वाधिक नफा कमवणारी कंपनी

Adar Poonawalla

कॉर्पोरेट कंपन्यांच्या व्यवहारासंदर्भात माहिती ठेवणाऱ्या कॅपिटलाइनने प्रकाशित केलेल्या नव्या अहवालानुसार सन २०१९-२० मध्ये भारतातील ४१८ भारतीय कंपन्यांनी पाच हजार कोटींपेक्षा जास्तचा व्यापार केला. यात सर्वाधिक नफा कमवणाऱ्या कंपन्यांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर ‘कोविशिल्ड’ ही कोरोना प्रतिबंधक लस तयार करणारी ‘सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया’ (Serum Institute of India) आहे.

भारतात कोरोनाच्या (Corona) दोन लसींच्या आपत्कालीन वापरासाठी परवानगी देण्यात आली आहे. यामध्ये, ‘कोविशिल्ड’ (COVISHIELD) बनवणाऱ्या सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाला आणि ‘कोवॅक्सिन’ (COVAXIN) बनवणाऱ्या भारत बायोटेकचा सामावेश आहे. लाइव्ह मिंटने दिलेल्या वृत्तानुसार सीरमने ५ हजार ४४६ कोटींच्या विक्रीच्या मोबदल्यात २ हजार २५१ कोटींचा निव्वळ नफा कमवला आहे. हा नफा नेट मार्जिनच्या ४१.३ टक्के इतका आहे.

या यादीमध्ये तळाला असणाऱ्या कंपन्या प्रामुख्याने अर्थपुरवठा करणाऱ्या (सिटी बँक, मुथूट फायनान्ससारख्या) किंवा मोनोपोली ऑप्रेशन्स क्षेत्रात काम करणाऱ्या (हिंदुस्तान झिंक अ‍ॅण्ड न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशनसारख्या) आहेत. पाच हजार कोटींचा उद्योग करणाऱ्या कंपन्यांच्या यादीमध्ये १८ कंपन्या औषध क्षेत्राशी संबंधित आहेत. या यादीमध्ये दुसऱ्या क्रमांकावर मॅकलेओड्स फार्मास्युटिकल्स आहे. या कंपनीने २८ टक्के नफा कमावला आहे.

सीरम कंपनीच्या नफ्याची टक्केवारी अधिक असण्यामागील मुख्य कारणांपैकी एक म्हणजे कंपनी भारतामध्ये लसीची निर्मिती करत असून जगामध्ये सध्या सर्वाधिक लसीची गरज भारतालाच आहे. त्यामुळेच जगातील सर्वांत मोठी औषध निर्मिती करणारी सीरम ही सर्वाधिक नफा कमवणारी कंपनी ठरली आहे. एप्रिल २०२० मध्ये पहिल्यांदा कंपनीने ऑक्सफर्ड अ‍ॅस्ट्राझेनेकासोबत येत कोविशिल्डची निर्मिती केली होती.

सीरमची मालकी असणाऱ्या पूनावाला समूहाने हॉर्स ब्रीडिंग, बांधकाम व्यवसाय, अर्थसाहाय्य, हवाई श्रेत्र यामध्येही गुंतवणूक केली आहे. २००८-०९ आणि २०१५-१६ दरम्यान सीरमचा महसूल २३ टक्के वाढून वार्षिक स्तरावर ४ हजार ६३० कोटींवर पोहचला. निव्वळ नफ्यात २८ टक्के वाढ होत तो १२ हजार १९१ कोटींवर पोहचला. मात्र सन २०१५-१६ ते २०१९-२० दरम्यान कंपनीच्या महसुलामध्ये चार टक्क्यांनी घट झाली आणि निव्वळ नफाही या वर्षांमध्ये कायम राहिला.

भारतामध्ये १८ वर्षांपेक्षा अधिक वयाच्या ८५ कोटी नागरिकांना लस देण्यासाठी १७० कोटी डोस लागणार आहेत. एका मुलाखतीत कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पूनावाला (Adar Poonawalla) यांनी कंपनीला तीन हजार कोटींची गरज असून या पैशांमधून दरमहिन्याला १० कोटी लसींची निर्मिती करता येईल असे सांगितले. हा पैसा बँकांकडून किंवा सरकारकडून मिळाला तरी हरकत नाही असे पूनावाला म्हणालेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button