शेतकऱ्यांकडे महावितरणचे २२ हजार कोटी थकीत- चंद्रशेखर बावनकुळे

Chandrasekhar Bawanakule

मुंबई :- महावितरणचे २२ हजार कोटी रुपये शेतकऱ्यांकडे थकीत आहेत. त्यामुळे २२ हजार कोटींचा घोटाळा झाला असे म्हणता येणार नाही, अशी प्रतिक्रिया माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. महावितरणने वीज वापराच्या आकड्यांमध्ये गोलमाल करून गेल्या पाच वर्षांत सुमारे ३० हजार कोटी रुपयांचा घोटाळा केल्याची माहिती एमईआरसीच्या अहवालातून उघड झाली आहे. बावनकुळे यांनी हा घोटाळा नाही, असे सांगताना उल्लेखित प्रतिक्रिया दिली.

शेतकऱ्यांना वर्षाला अंदाजे ३३ हजार ८५६ दशलक्ष युनिट वीज पुरवल्याचे महावितरण सांगत असले तरी प्रत्यक्षात २२ हजार ८५६ दशलक्ष युनिट एवढा शेतकऱ्यांचा वीज वापर असल्याचे वीज नियामक आयोगाच्या चौकशीत स्पष्ट झाले आहे. वाढीव वीज वापर दाखवून महावितरणने शेतकऱ्यांकडून २२ हजार कोटी रुपये, तर सरकारकडून सवलतीच्या निधीतून ८ हजार २२५ कोटी रुपये लाटले आहेत. मात्र, चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात, राज्यात ४५ लाख शेतकरी आहेत. कोल्हापूर, रत्नागिरी सोडले तर शेतकऱ्यांकडे मीटर नाही, त्यांच्याकडे हे बिल थकीत असल्याने घोटाळा झाला, असे म्हणता येणार नाही.

ठाणे : अल्पसंख्याक बहुल नागरी क्षेत्रातही पालिका करणार विकासकामे