नाग नदी संवर्धन व प्रदूषण नियंत्रणासाठी २११७. ५४ कोटींच्या प्रकल्पाला मंजुरी

Nitin Gadkari

नागपूर शहरातून वाहणाऱ्या प्रदूषित नाग नदीच्या संवर्धन आणि प्रदूषण नियंत्रणासाठी २११७. ५४ कोटींच्या प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्या अध्यक्षतेत जागतिक बँकेचे अधिकारी, ‘स्वच्छ गंगा राष्ट्रीय अभियान’चे डीजी राजीव रंजन मिश्रा, नागपूर मनपाचे आयुक्त बी. राधाकृष्णन यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीनंतर याबाबची घोषणा करण्यात आली. ‘राष्ट्रीय नदी संरक्षण संचालनालय’ या प्रकल्पाचे काम करणार आहे. या प्रकल्पामुळे नाग व तिच्या उपनद्यांचे प्रदूषण कमी होऊन नागपूर शहराचेही प्रदूषण कमी होईल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER