मराठा आरक्षणासाठी महाराष्ट्रातील ४८ पैकी २१ खासदारांचा पाठिंबा

नवी दिल्ली : मराठा आरक्षणासाठी (Maratha reservation) राज्यसभेचे खासदार संभाजीराजे छत्रपती (MP Sambhaji Raje Chhatrapati) यांना प्रत्यक्ष भेटून महाराष्ट्रातील ४८ पैकी २१ खासदारांनी पाठिंब्याची पत्रे दिली आहेत. यामध्ये सुभाष भामरे, धुळे (माजी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री), राजन विचारे (ठाणे), प्रतापराव पाटील-चिखलीकर (नांदेड), हेमंत पाटील (हिंगोली), संजय मंडलिक (कोल्हापूर), सदाशिव लोखंडे (शिर्डी), संजय पाटील (सांगली), श्रीरंग बारणे (मावळ), हेमंत गोडसे (नाशिक), डॉ. श्रीकांत शिंदे (कल्याण), धैर्यशील माने (हातकणंगले), नवनीत कौर राणा (अमरावती), राहुल शेवाळे (दादर), प्रतापराव जाधव (बुलढाणा), ओमराजे निंबाळकर (धाराशिव), डॉ. भारती पवार (दिंडोरी), हिना गावित (नंदूरबार), रक्षा खडसे (रावेर), डॉ. प्रीतम मुंडे (बीड), डॉ. सुजय विखे पाटील (नगर), उन्मेष पाटील (जळगाव) या खासदारांचा समवेश आहे.

मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्याने मराठा समाजात मोठा असंतोष आहे. मराठा समाज राज्यभर आक्रमक आंदोलने करत आहे. कोणत्याही परिस्थितीत मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मराठा समाज आग्रही आहे. दरम्यान, खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मराठा समाजाला मिळालेले आरक्षण टिकावे यासाठी गट-तट व पक्षभेद विसरून महाराष्ट्रातील सर्व खासदारांनी एकत्र येण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार आतापर्यंत २१ खासदारांनी मराठा आरक्षणाला पाठिंबा दर्शविला आहे. लवकरच महाराष्ट्रातील सर्वपक्षीय खासदार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटून मराठा आरक्षणावर लवकरात लवकर तोडगा काढावा यासाठी निवेदन देणार आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER