‘जलेबी ने फाफडा, उद्धव ठाकरे आपडा’ म्हणत २१ गुजराथी उद्योगपतींचा शिवसेनेत प्रवेश

Shivsena

मुंबई : ‘मुंबई मा जलेबी ने फाफडा, उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आपडा’ असं म्हणत आज मालाडच्या २१ गुजराथी उद्योगपतींनी जाहीररीत्या शिवसेनेत प्रवेश केला. गुजराती उद्योगपतींच्या शिवसेना (Shivsena) प्रवेशाने शिवसेनेला आर्थिक बळ तर मिळणार आहेच शिवाय ऐन पालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपच्या व्होटबँकेला सुरुंग लावण्यातही शिवसेनेला यश मिळणार असल्याची चर्चा चांगलीच रंगली आहे.

शिवसेनेचे राष्ट्रीय संघटक हेमराज शहा यांनी आज गुजराती बांधवांसाठी मालाडच्या सिल्व्हर ओक रेस्टॉरंटच्यावर लँडमार्क हॉलमध्ये पक्षप्रवेशाचा कार्यक्रम घेतला. यावेळी तब्बल २१ गुजराथी उद्योगपतींनी शिवसेनेत प्रवेश केला. मुंबई महापालिका निवडणुकीला आता एक वर्षाचा अवधी उरलांय. त्यामुळे शिवसेनेनं आता भाजपची व्होटबँक असलेल्या गुजरातीबहूल विभागात मतदारांना आकर्षित करण्यासाठी विविध कार्यक्रमांचं आयोजन सुरू केलं आहे. त्याचाच एक भाग म्हणून हा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER