अणुबॉम्बसाठी वापरला जाणारा २१ कोटींचा युरेनियम मुंबईतून जप्त, दोघांना अटक

atomic bomb seized from Mumbai - Maharashtra Today

मुंबई : आता एक धक्कादायक बातमी हाती आली आहे. दहशतवाद विरोधी पथकाने मोठी कारवाई करत मुंबईतील नागपाडा भागातूनअणुबॉम्बसाठी वापरल्या जाणाऱ्या अत्यंत ज्वालाग्राही अशा युरेनियमचा मोठा साठा मुंबईत जप्त केला आहे. पथकाने सात किलो युरेनियमसह दोघांना अटक केली आहे. जप्त करण्यात आलेल्या युरेनियम किंमत २१ कोटी रुपये आहे. दरम्यान, हे युरेनियम नेमके कशासाठी आणल्या गेले याबाबतची चौकशी सध्या एटीएसचे पथक करत आहे.

जिगर पांड्या आणि अबू ताहिर अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. या दोघांनाही १२ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. ठाण्यात राहणारा जिगर पांड्या हा युरेनियम विकण्याच्या प्रयत्नात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे एटीसच्या नागपाडा युनिटने सापळा रचून जिगरला अटक केली. पांड्या तसेच ताहिर या दोघांवर ॲटोमिक एनर्जी ॲक्ट १९६२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, मानखुर्द येथे राहणाऱ्या अबू ताहिरकडून त्याला युरेनियम मिळाले असल्याची माहिती चौकशीतून पुढे आली आहे. एटीएसने अटक केलेले आरोपी जिगर पांडया आणि अबू ताहिर दोघंही एकमेकांचे कॉलेजपासून मित्र आहेत. जिगर पांड्या आयटी कंपनीत काम करतो, तर अबू ताहिर इम्पोर्ट-एक्स्पोर्टचं काम करतो. दोघांनीही एमबीएच शिक्षण घेतलं आहे. ताहिरच्या वडिलांचा गोवंडी येथे भंगारचा व्यवसाय होता. एका भंगाराच्या ट्रकमधून पाच ते सहा वर्षांपूर्वी हे युरेनियम आलं होतं. इतक्या मोठ्या प्रमाणात युरेनियम कशासाठी आणले गेले होते, याचा तपास एटीएसकडून सुरु करण्यात आला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button