२०८२ कोटी पीक कर्ज वाटप : कोल्हापूर राज्यात प्रथम

2082 कोटी पीक कर्ज वाटप

कोल्हापूर : जिल्ह्याकरिता २ हजार ४८० कोटींचे वार्षिक उद्दिष्ट देण्यात आले होते. ३० नोव्हेंबर अखेर २ हजार ८२ कोटी इतकी उद्दिष्टपूर्ती करून कोल्हापूर (Kolhapur) जिल्हा राज्यात प्रथम स्थानावर राहिला आहे. सन २०२१-२२ करिता जिल्ह्याचा १११०७.६४ कोटी रुपयांचा संभाव्य वित्त पुरवठा आराखडा नाबार्डच्यावतीने सादर करण्यात आला.

जिल्हा अग्रणी व्यवस्थापक माने यांनी स्वागत करून सविस्तर आढावा दिला. ते म्हणाले, ३० सप्टेंबरपर्यंत पंतप्रधान जनधन योजनेंतर्गत ११ लाख १९ हजार ४०९ खाती उघडण्यात आली आहेत. ८ लाख १ हजार ७२४ खात्यांमध्ये रूपेकार्ड प्रदान करण्यात आले आहे. प्रधानमंत्री जीवन सुरक्षा विमा योजनेंतर्गत ४ लाख ८९ हजार ९५ खाती उघडण्यात आली आहेत. प्रधानमंत्री जीवनज्योती योजनेंतर्गत १ लाख ८९ हजार ६६८ खाती उघडण्यात आली आहेत. अटल विमा योजनेंतर्गत ६० हजार २२४ खाती उघडण्यात आली आहेत. सप्टेंबरअखेर प्रधानमंत्री मुद्रा योजनेंतर्गत १५ हजार ७०० लोकांना २२८.९३ कोटींचे अर्थसाहाय्य पुरवण्यात आले आहे.

  • प्राथमिकता प्राप्त सेवाकरिता ९ हजार ३२० कोटींचा आराखडा
  • ३० सप्टेंबरअखेर एकूण उद्दिष्टांपैकी ५ हजार २०१ कोटी (५६ टक्के) पूर्तता
  • ३०सप्टेंबरअखेर ३० हजार ४१४ कोटी ठेवी
  • जिल्ह्यात २३ हजार ७२३ कोटी कर्जाची शिल्लक
  • आत्मनिर्भर भारतनुसार पीएम स्वनिधी योजनेंतर्गत पथविक्रेत्यांना ४ हजार ७९५ खात्यांमध्ये ४.८० कोटी वाटप

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER