विधानसभा निवडणूक 2018 निकाल; चार राज्यात काँग्रेसची मुसंडी!

Election-Congress

नवी दिल्ली :– मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, तेलंगणा आणि मिझोरम या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल आज हाती येणार आहेत. आज सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली असून, आतापर्यन्त हाती आलेल्या माहितीनुसार चारही राज्यात काँग्रेसची विजयी घोडदौड सुरु आहे. तर मिझोराममध्ये काँग्रेसला पराभवाचा सामना करावा लागू शकतो.

पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उभ्या राहिलेल्या 8 हजार 500 उमेदवारांचं भविष्य ईव्हीएम (इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशिन्स) दडलं आहे. एबीपी न्यूज-लोकनीती-सीएसडीएस यांच्या एक्झिट पोलनुसार भाजपच्या हातून मध्य प्रदेश आणि राजस्थान ही दोन महत्त्वाची राज्यं निसटण्याची शक्यता आहे. मात्र आतापर्यन्त हाती आलेल्या निकालानुसार चार राज्यात काँग्रेस पुढे आहे.