कोल्हापुरात 20 हजार लोक क्वारंटाईन

20000 People Quarantine

कोल्हापूर : कोल्हापूर महापालिकेने शहरात 21 ठिकाणी इन्स्टिट्युशन क्वारंटाईन (अलगीकरण कक्ष) इमारती तयार केल्या आहेत. यामध्ये 1128 नागरीकांना ठेवण्यात आले. तर हॉटेल्समध्ये सुमारे 300 हून अधिक लोक थांबले आहेत. याशिवाय १० तालुक्यातील सर्वच प्रमुख गावातील देऊळ, शाळा, वसतीगृह आदीसह घरी अलागिकरान केलेले
असे सुमारे 20 हजार लोक आठवड्यापासून कोल्हापुरात आहेत. हे सर्व लोक मुंबई आणि पुणे येथून आले आहेत.

कोल्हापूर शहरातील शेंडापार्क येथील आरोग्य प्रशिक्षण केंद्रातील अलगीकरण कक्षामध्ये 39, खाजगी हॉटेल (14 ठिकाणी) 230, आणि अंडी ऊबवणी केंद्र येथे 16, पंजाबराव देशमुख वस्तिगृह 77, गर्व्हमेंट पॉलिटेक़्नीक 4 व राजाराम कॉलेज 43, अल्पसंख्यांक मुलींचे वस्तीगृह 86, आयसोलेशन 12, कृषी विद्यापीठ वस्तीगृह 41, शिवाजी विद्यापीठ 257, शिवाजी विद्यापीठ मुलांचे वस्तीगृह 78, न्यू कॉलेज वस्तीगृह 119, सैनिकी मुलींचे वस्तीगह 39, विवेकानंद कॉलेज 26, कमला कॉलेज 29, डि.बी.पाटील वस्तीगृह 8, माई तेंडुलकर वस्तीगृह 5, जैन बोर्डिंग 12, लिंगायत वस्तीगृह 7, नागरीकांना अलगीकरण कक्षामध्ये ठेवण्यात आलेले आहे. या सर्वांना चौदा दिवस या ठिकाणी ठेवण्यात येणार आहे. होम कोरंटाईन म्हणून 885 नागरीकांना ठेवण्यात आले आहे आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER